Home ताज्या बातम्या मोठी बातमी : पुजाऱ्यांना मिळणार दरमहा 18,000 सन्मान निधी

मोठी बातमी : पुजाऱ्यांना मिळणार दरमहा 18,000 सन्मान निधी

पुजाऱ्यांना मिळणार दरमहा 18,000 सन्मान निधी अरविंद केजरीवाल यांची घोषणा Arvind Kejriwal's announcement Pujari Samman Yojana 18,000 Delhi

New Delhi : दिल्लीतील पुजारी आणि ग्रंथींसाठी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्ष सरकारने नवी योजना जाहीर केली आहे. ‘पुजारी-ग्रंथी सन्मान योजना’ (Pujari Samman Yojana) असे या योजनेचे नाव असून, याअंतर्गत दिल्लीतील मंदिरातील पुजारी आणि गुरुद्वाऱ्यांतील ग्रंथींना दरमहा १८,००० रुपये सन्मानरूपी दिले जाणार आहेत.

केजरीवाल यांनी एका पत्रकार परिषदेत या योजनेची घोषणा केली. ३१ डिसेंबरपासून कनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात या योजनेच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. आम आदमी पक्ष सरकार सत्तेत आल्यानंतर त्वरित या योजनेची अंमलबजावणी होईल, असे केजरीवाल यांनी सांगितले.

या घोषणेच्या वेळी केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षावर टीका करत म्हटले की, “महिला सन्मान योजना आणि संजीवनी योजनेसारख्या योजनेला रोखण्याचा प्रयत्न भाजपने करू नये.” त्यांनी भाजप व काँग्रेस पक्षांना आवाहन केले की, त्यांनीही आपल्या राज्यांमध्ये पुजारी-ग्रंथींसाठी अशी योजना सुरू करावी.

देशातील पहिली योजना (Pujari Granthi Samman Yojana)

“देशात पहिल्यांदाच अशी योजना जाहीर झाली आहे. मंदिरातील पुजारी व गुरुद्वाऱ्यातील ग्रंथींच्या सन्मानासाठी कोणत्याही सरकारने आतापर्यंत असा विचार केला नव्हता,” असे केजरीवाल यांनी नमूद केले.

हे ही वाचा :

मोठी बातमी : विमानाचा भीषण अपघात, 42 जणांच्या मृत्यूची शक्यता

मोठी बातमी : लाडक्या बहीणींच्या खात्यात आजपासून जमा होणार डिसेंबरचा हप्ता

इयत्ता पाचवी ते आठवी ढकलगाडी अखेर बंद, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय!!

प्रसिद्ध चित्रपटनिर्माते श्याम बेनेगल यांचे ९० व्या वर्षी निधन

प्रेयसीने प्रियकराचा प्राईव्हेट पार्ट कापून केला धडापासून वेगळा, वाचा काय आहे कारण

गायांनी कारचा पाठलाग करत वासराला वाचवलं, पहा भावनिक व्हिडिओ

Exit mobile version