Mutton bhakari recipe : काळ्या मसाल्यात शिजलेलं लुसलुशीत मटण, सोबत चुलीवर भाजलेली बाजरीची भाकरी. चवीला कांदा, लिंबू अन् मिरचीचा ठेचा, असं वर्णन ऐकल्यावर तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. मटण भाकरीचा मोठा शौकीनवर्ग असलेल्या खवय्यांना गावरान मटण भाकरीचे वेध लागले आहेत, कारण आता थर्टी फर्स्टच्या पार्टीची तयारी सुरू झाली आहे. झणझणीत मटण भाकरी हा अनेकांचा आवडता आहार आहे, त्यात चुलीवरची मटण भाकरीला सध्या खवय्यांची खास पसंती आहे. पुणेरी, कोल्हापुरी, सातारी, माणदेशी मटण भाकरी पश्चिम महाराष्ट्रातील मोजक्या हॉटेल्स मध्ये मिळते. (Mutton bhakari)
काळ्या मसाल्यात शिजलेलं लुसलुशीत मटण, सोबत चुलीवर भाजलेली बाजरीची भाकरी. चवीला कांदा, लिंबू अन् मिरचीचा ठेचा आणि भरपेट मटण भाकरीचा आस्वाद घेण्यासाठी खवय्ये 31 डिसेंबर साजरा करत असतात. मटण भाकरीचा मोठा शौकीनवर्ग शहरातून थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी मटण भाकरीची काही भन्नाट हॉटेलं शोधत असतो.
बोकडाचे मटण खाण्याचे खूप फायदे आहेत. यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, जीवनसत्त्वे (Vitamins) आणि खनिज मोठ्या प्रमाणत असतात यामुळेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते, बकर्याचे मांस आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे. शरीरातील रक्ताची पातळी कमी होणे, यावर मटन खाणे फायद्याचे आहे. कारण मटणात भरपूर लोह असते. ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.
Mutton bhakari recipe
काळ्या मसाल्याचा तडका आणि ओले सुके खोबरे सह अस्सल गावरान मसाल्याची ग्रेव्ही चुलीवर मडक्यात किंवा पितळेच्या भांड्यात मटण शिजवले जाते. अस्सल तुपात पाणी न घालता काही ठिकाणी मटण करी, रस्सा, सुक, तळलेली मटणाची थाळी कितीही महाग असली तरी खवय्ये त्यावर तुटून पडतात. अनेक ठिकाणी घरगुती मटण आणि आजही चुलीवर खरपूस भाजली जाणारी बाजरीची भाकरी असा आस्वाद घेत थर्टी फस्ट साजरा केला जातो.
यातील मसाल्यात त्यात धणे, वेलची, जायफळ, दगडफूल, तमालपत्र, तेजपानसारख्या खड्या मसाल्यांचा समावेश असल्याने चवीत झणझणीतपणा तर येतोच शिवाय वेगळा सुगंध दरवळतो. त्यानंतर या मसाल्यात मटण टाकलं जातं. मुख्य म्हणजे मटण न शिजवता टाकलं जातं. एरवी मटण आधी वेगळं उकडून घेतात, पण अस्सल ग्रामीण ढंगाच्या मटण भाकरी साठी वेगळी रेसिपी असते.
यामध्ये ‘मटण आधी उकडून घेतलं तर त्याच्यातला अर्क तयार होणाऱ्या सूपमध्ये मिसळतो. पुन्हा ते सूप वापरून भाजी करण्यापेक्षा मटण थेट भाजीत तेलात शिजवल जाते. त्यामध्ये ग्रेव्ही मिसळली जाते. (Mutton bhakari)
यामध्ये विविध प्रकारच्या थाळी आज नामवंत हॉटेलमध्ये उपलब्ध आहेत. हे मटण तुम्ही घरी बनवून मटण भाकरीचा आनंद घेऊ शकाल. त्यामुळे संपूर्ण कुटुंब लहान मुला बाळासहित नव्या वर्षाचे स्वागत करता येईल.
ग्राहकांच्या आवडीनुसार येथील भाजीचा तिखटपण ठरतो. मात्र मध्यम चवीचे मटण खरपूस भाजलेल्या भाकरीबरोबर कुसकरून खाण्याची मजा काही औरच आहे. कोणाला रस्सा, कोणाला सुक्क, कोणाला मिक्स किंवा कोणाला हळद, तिखट सूप अशा प्रकारे मटण भाकरीचा आस्वाद घेता येतो.
मुख्य म्हणजे त्यात पाणी न टाकता ते तेलात परतले जाते. मटणाला थोडी आच लागल्यावर त्यात पाणी टाकून शिजवले जाते. यातील सूप वेगळे काढले जाते. त्यामुळे मटणाला फक्त मसाल्याचीच चव राहते. झणझणीत तिखट तर्री ही थंडीच्या दिवसात भुरकुन प्यायची असते. असा रस्सा प्यायल्या तरी जळजळ होत नाही, चला मंडळी नव्या वर्षाचे स्वागत करूया, अस्सल गावरान मटण भाकरीचा आस्वाद घेऊन!
संकलन – क्रांतीकुमार कडुलकर, पिंपरी चिंचवड
हे ही वाचा :
मोठी बातमी: संतोष देशमुख हत्या प्रकरण ; वाल्मिक कराडची सीआयडीसमोर शरणागती
Mutton bhakari : टण टण वाजलं; झणझणीत मटण भाकरी
बीएसएनएलमध्ये १९,००० कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती, खर्च कपातीसाठी मोठे पाऊल
पुणे मेट्रो फेज 2 मध्ये सात नवीन मार्गांचा समावेश