पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्पर्धा परीक्षा केंद्र यमुना नगर निगडी या ठिकाणी चालू करण्यात आलेला आहे. (PCMC)
या स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या गट क परीक्षेचे संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सकल मातंग समाज व शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा परंतु या ठिकाणी यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा अभिनंदन नामउल्लेख करत असताना संबंधित ग्रंथ पालाने वरील ठिकाणी अभ्यास करून यश संपादन केलेल्या जागेचा नामउल्लेख जाणून बघून टाळला आहे. (PCMC)
या निंदनीय कृतीचा सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य व शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष लोकसेवा युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निषेध संबंधित ग्रंथपालांनी तात्काळ लेखी स्वरूपाची लेखी माफीनामा देण्यात यावा. (PCMC)
अन्यथा निदर्शने करण्यात येणार आहेत, या कामी उद्भवणाऱ्या सर्व गोष्टींची जबाबदारी संबंधित ग्रंथपालची राहील असा इशारा शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड महासचिव सुरज यांना कांबळे यांनीसोशल मिडीया द्वारे दिला आहे.
आयुक्त साहेब ग्रंथपालाला तात्काळ त्या पदावरून हकालपट्टी करा अशी मागणी शिवशाही व्यापारी संघ अध्यक्ष शिवाजीराव खडसे यांनी केले आहे.