प्रत्येक मंदिरातून अध्यात्मिक भाव जागृत झाला पाहिजे – डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे (PCMC)
पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – स्वातंत्र्यवीर समर्थ मंडळाचे संस्कृती संवर्धन व विकास महासंघाचा १५ व्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे विश्वस्त आळंदी देवस्थान ट्रस्ट यांचे व्याख्यान झाले. (PCMC)
भावार्थ देखणे म्हणाले जसे राम मंदिर होण्याआधीही रामांचे संस्कार होते पण राम मंदिर झाल्यामुळे प्रत्येकातील अध्यात्मिक भाव जागृत झाला. मंदिरात स्वच्छता, पावित्र्यता अत्यंत महत्त्वाची त्याचप्रमाणे मंदिरांना वैचारिक दृष्ट्या सर्व समावेशक होता आलं पाहिजे.
तेव्हा मंदिरे संस्कार केंद्र होतील. मंदिरात लहान मुलांना घेऊन गेले पाहिजे तशी व्यवस्था मंदिर प्रमुखांनी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असेही ते म्हणाले.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2025/02/1000681726-1024x464.jpg)
प्रमुख पाहुणे चंद्रशेखर भावे म्हणाले भारत आता स्वदेशी तंत्रज्ञानात प्रगती करत आहे. नुकतेच आम्ही जहाजाच्या आतील व संसदेतील पुर्ण ऑडिओ सिस्टिम अशाच स्वदेशी तंत्रज्ञानाने बनविली. याकरिता सध्याचे सरकार आवश्यक मदत करीत आहे. (PCMC)
कार्यक्रमाचे सुरुवात स्वामी विवेकानंद व भारत मातेच्या प्रतिमा पुजन व प्रार्थनेने झाली. प्रस्तावना हभप किसन महाराज चौधरी यांनी केली तर सुत्रसंचालन उज्ज्वला केळकर यांनी केले. पाहुण्यांचे परिचय ज्योती कानिटकर व चंद्रशेखर जोशी यांनी केले.
शिवानंद चौगुले यांनी आभार मानले.
प्रसंगी सुमारे शंभर नागरिकांसह मठ, मंदिर व धार्मिक संस्थांचे प्रतिनिधींचा उपस्थिती लक्षणीय होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रविजी कळंबकर, विकास देशपांडे, माधुरी ओक, अभयकुमार पंचपोर, डॉ अजित जगताप, शामराव तावडे आदी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले.