पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज च्या वतीने महाविद्यालयात ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन 2025 हे वर्ष कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष जाहीर केल्या प्रित्यर्थ कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सर्वांसाठी यात कृत्रिम बुद्धिमत्ता रोबोट्स कसे काम करते ,त्याच्या प्रभावी वापर कसा करता येईल यासाठी फेसबुक व युटूबवर थेट प्रक्षेपणाद्वारे एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन संस्थेचे संस्थापक सचिव डॉ़. दीपक शहा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. (PCMC)
कृत्रिम बुद्धिमत्तेचे तज्ञ व व्याख्याते नाशिक येथील प्रा. किरणकुमार जोहरे यांच्या हस्ते रिमोट द्वारे विद्युत दीप प्रज्वलना द्वारे एकदिवसीय कार्यशाळेचे उद्धाटन करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावरती प्राचार्य डॉ. ए. के. वाळुंज, उपप्राचार्या डॉ क्षितिजा गांधी, कार्यशाळेच्या समन्वयिका डॉ. राजश्री ननावरे याच्यासमवेत ऑनलाईन सुमारे 3500 विद्यार्थी व महाविद्यालयाचे 115 प्राध्यापकांनी सहभाग या एक दिवसीय कार्यशाळेत नोंदविला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . ए के वाळुंज यांनी व्याख्याते प्रा . किरणकुमार जोहरे यांचा शाल , स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.
व्याख्याते प्रा किरणकुमार जोहरे मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, जगभरात बदलणाऱ्या तंत्रज्ञानानुसार आपल्यात देखील बदल घडवुन आणला पाहिजे. त्यासाठी आपली विचारसरणी देखील बदलावी लागेल. ही काळाची देखील गरजच आहे. आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI ) रोबोट्सच्या नैतिक आणि शाश्वत वापरासाठी धोरणे तयार करावी लागतील. याद्वारे पीक उत्पादनासाठी स्वयंचलित कृषी उपकरणे आणि हवामानाच्या परिणामाच्या अनुमान बांधता येईल. कृषी उत्पन्न वाढीस मदतच होणार आहे. आज अनेक उद्योगांमध्ये अचूक उत्पादन निर्मिती आज रोबोटसचा वापर करण्यात येत आहे. रोबोट्स वैद्यकीय क्षेत्रात शस्त्रक्रिया करताना वापरात येत आहे. अवकाश संशोधनासाठी मंगळ आणि चंद्रावरही पोहोचले आहे. (PCMC)
प्राध्यापकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, समजून घेवून विधायक पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करू शकतील. आज शाळा महाविद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI ) रोबोट्स तंत्रज्ञान येऊ पाहत आहे. भविष्यात कदाचित प्राध्यापकाची जागा रोबोटस घेऊ शकतील. महाराष्ट्रात उद्योग क्षेत्रात व काही हॉटेलमध्ये वेटरचे काम रोबोट्स करू लागले आहे.
चीनमध्ये वकिली क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता चे रोबोट्स काम करू लागले परंतु तेथील वकिलांनी त्याचा विरोध केला आहे. अमेरिकेतही चित्रपट कथा, पटकथा लेखनाचे काम रोबोट्स करीत आहे.
तेथेही तेथील चित्रपट लेखकांचा विरोध होत आहे .प्रा किरणकुमार जोहरे यांनी या टूलचा वापर कृत्रिम बुद्धिमत्तात कसा केला जातो, याची सर्वीस्तर माहिती देऊन उपस्थितांच्या शंकाचे समर्पकपणे निरसन केले.
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. ए. के. वाळुंज यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता ( ए आय) रोबोट्स भावी पिढीसाठी कसे उपयुक्त आहे याची सर्वीस्तर माहिती विशद केली. प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी हे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहनही केले . भविष्यात उपयोगी पडेल असे भाकितही त्यानी व्यक्त केले . डॉ. जयश्री मुळे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
एक दिवशीय कार्यशाळा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा रसिका पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ रूपा शहा यांनी करुन दिला तर आभार कार्यशाळेच्या समन्वयिका
डॉ. राजश्री ननावरे यांनी मानले .