Home पुणे - पिंपरी चिंचवड Pune : उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या धाडसी व यशस्वी कार्यरत स्त्रियांना त्याच्या कामाबद्दल...

Pune : उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या धाडसी व यशस्वी कार्यरत स्त्रियांना त्याच्या कामाबद्दल पुरस्कार!

पुणे : सृष्टी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अंबाजोगाई, जि. बीड यांच्या वतीने पुणे येथे राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ पुरस्कार 2025 या पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. (Pune)

यावेळी सांस्कृतिक, सामाजिक अश्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या धाडसी व यशस्वी स्त्रियांना त्याच्या कामाबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पुणे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे शनिवारी दि. 8 फेब्रुवारी 2025 दु. 12.30 वा. या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.


यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर सृष्टी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाध्यक्षा श्रीमती मिनाक्षी विकास डोगरे तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती अनिता लक्ष्मण काळे (राज्यकार्याध्यक्ष मराठा समन्वय परिषद, महाराष्ट्र राज्य) या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिभा पाटील (उपआयुक्त सामान्य प्रशासन, पुणे महानगरपालिका) यांची उपस्थिती होती.

तसेच मा.डॉ. स्मिता बारवकर (मॉडेल/केंद्रीय फिल्म सल्लागार समिती मंडळ सदस्य, मुंबई) ह्या देखील व्यासपीठावर उपस्थित होत्या.

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या भारत देशात पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो, पत्रकार म्हणजे समाजाचा आरसा म्हणून ओळख आहे, चागल्या गोष्टीला प्रोत्साहन आणि वाईट गोष्टीवर प्रहार करुण समाजाला दिशा देण्याचे काम पत्रकार करत असतात. (Pune)

कार्यक्रमाची सांगता आलेल्या मान्यवरांच्या हस्ते सामाजिक कामात कर्तुत्ववान महिलांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ पुरस्कार 2025 यासाठीचे सन्मानपत्र व गौरव ट्रॉफी देऊन झाली. यावेळी

1. वर्षा चव्हाण (पोलीस वार्ता न्यूज, महाराष्ट्र जनभूमी न्यूज, मार्मिक समाचार न्यूज)

2. श्रावणी कामत (क्राईम रिपोर्टर)

3. प्रज्ञा आबनावे (वतन की लकीर न्यूज)

4. रेखा भेगडे (सतर्क महाराष्ट्र न्यूज)

राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार देवून त्यांना गौरविण्यात आले आहे, त्यांच्या या उत्कृंष्ट पुरस्काराबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या भारत देशात पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो, पत्रकार म्हणजे समाजाचा आरसा म्हणून ओळख आहे, चागल्या गोष्टीला प्रोत्साहान आणि वाईट गोष्टीवर प्रहार करुण समाजाला दिशा देण्याचे काम पत्रकार करत असतात.

या सर्व महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले व पुढील वाटचालीस त्यांना प्रोत्साहन व शुभेच्छा देण्यात आले.

पत्रकारितेच्या माध्यमांतून आपले कार्य कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे. तुम्हांला सर्वसामान्य जनतेकडून आणि सर्व पत्रकार बांधवांकडून आपल्या उत्कृष्ठ पुरस्कारांबद्दल आपले मनस्वी अभिनंदन आणि तुम्हांला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत.

Exit mobile version