Sunday, March 16, 2025

संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये गुरूपौर्णिमेनिमित्त गुरूंचा सन्मान

पुणे / राजेंद्रकुमार शेळके : पिरंगुट येथील संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा या ओळीप्रमाणे संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या सर्व गुरुजनांची पूजा केली. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहा साठे तसेच व्याख्यान करते अभिजीत शिंदे, बसवराज बेन्नी यांच्या हस्ते देवी सरस्वतीची पूजा करून करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरूंविषयी आदर व्यक्त करताना श्लोकांचे पठण केले. भाषणे, कविता सादर केल्या. जगप्रसिद्ध गुरु शिष्यांच्या जोड्या जसे शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊ, द्रोणाचार्य आणि एकलव्य अशा वेशभूषा परिधान करून नाट्य सादरीकरण केले.

विद्यार्थ्यांच्या अंगी अध्यात्म गुण यावेत विद्यार्थी संस्कारक्षम घडावा यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका कायमच प्रयत्नशील असतात आणि यासाठीच आज गुरुपौर्णिमेनिमित्त व्याख्यान करते अभिजीत शिंदे यांचे विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान ठेवण्यात आले. त्यांनी अनेक उदाहरणांचे दाखले देत विद्यार्थी हा विद्यार्थी अवस्थेत असताना त्याने आपला गुरु म्हणजे शिक्षक याला आपल्या आयुष्यात सर्वोच्च स्थान दिले पाहिजे. तसेच विविध गुरु शिष्यांच्या जोड्यांविषयी माहिती देत विद्यार्थी कसा घडला पाहिजे याविषयी खूप छान पद्धतीने विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत व्याख्यान दिले.

विद्यार्थ्यांना नक्कीच त्यांच्या आयुष्यात हे उदाहरणे उपयोगी ठरतील संपूर्ण वातावरण अध्यात्ममय झाले होते. विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी छान भेटकार्डे बनवली होती. तसेच त्यांनी आपल्या आई-वडिलांनाही भेट कार्ड देऊन गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्या. सुंदर फलक लेखन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका स्नेहा साठे यांच्या मार्गदर्शनाचा खाली करण्यात आले होते तसेच कार्यक्रमाचे सादरीकरण उंडेगावकर, जाधव, मातेरे तसेच नर्सरी सेक्शन चे सर्व शिक्षक व ताई यांनी केले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles