Sunday, May 5, 2024
Homeग्रामीणअंजनी नलावडे यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात संपन्न

अंजनी नलावडे यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात संपन्न

पुणे / राजेंद्रकुमार शेळके : ग्रामविकास मंडळ ओतूर संचलित पुष्पावती विद्यालय डिंगोरे या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अंजनी जयंतराव डुंबरेमॅडम यांचा ‘सेवापूर्ती आणि सेवा गौरव समारंभ नुकताच उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. पुष्पावती विद्यालय डिंगोरे येथून मुख्याध्यापिका पदावरून सेवानिवृत्त होणाऱ्या अंजनी डुंबरे यांचे इंग्रजी भाषेवर प्रचंड प्रभुत्व असलेल्या अंजनी डुंबरे या १९९१ साली चैतन्य विद्यालय ओतूर येथे सहशिक्षिका पदावर रूजू झाल्या होत्या.

बत्तीस वर्षांचा प्रदिर्घ सेवा काळ यशस्वीपणे पूर्ण झालेल्या अंजनी डुंबरेमॅडम यांच्या ‘सेवापूर्ती आणि सेवा गौरव समारंभ’ नुकताच मोठ्या उत्साहःपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या निरोप समारंभाला अनिल तांबे, अध्यक्ष, ग्रामविकास मंडळ ओतूर, सुप्रसिद्ध लेखिका, निवेदिका आणि निरूपणकार डॉ. सौ. लता पाडेकर, स्तंभलेखक संजय नलावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, संचालक बाजीराव मानकर आवटे हायस्कूल जुन्नर, रघुनाथ तांबे, खजिनदार, ग्रामविकास मंडळ ओतूर, सीमाताई सोनवणे, सरपंच डिंगोरे, संपत लोहोटे, सबाजी लोहोटे, राजेश सुकाळे, संदीप शिंगोटे, प्रदीप गाढवे, पंकज घोलप, सचिन तांबे, ज्ञानेश्वर पानसरे, अशोक अहिनवे, सिताराम डुंबरे, प्रकाश डुंबरे, लक्ष्मण लोहोटे, प्रतिक अकोलकर, के.एस्.ढोमसे, ग्रामस्थ, पालक, नातेवाईक, मित्र परिवार तसेच शिक्षक वृंद आदि अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी वनिता भोर, संपत लोहोटे, लता पाडेकर, संजय नलावडे, शिवाजी अस्वार, प्रदीप गाढवे, लता पाडेकर, रघुनाथ तांबे, सीमा सोनवणे, अंकुश आमले यांनी तसेच आदिती थापेकर, परी भिसे, कृतिका आमले या विद्यार्थीनींनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली. या समारंभाचे प्रास्ताविक गाढवे जे.जी., सत्कार नियोजन डी.डी.घोलप, आभार डी.एस्.पाटील यांनी तर विठ्ठल शितोळे यांनी सूत्रसंचालन केले. अतिशय संघर्षपूर्ण पण अभिमानास्पद जीवनप्रवास असलेल्या अंजनी जयंतराव डुंबरे यांना भावी आयुष्यासाठी सर्वांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय