Friday, May 17, 2024
Homeराजकारणअजित पवारांवरील "त्या" वक्तव्यावर संजय राऊतांनी व्यक्त केला खेद; म्हणाले, "मी त्यावर...

अजित पवारांवरील “त्या” वक्तव्यावर संजय राऊतांनी व्यक्त केला खेद; म्हणाले, “मी त्यावर कडक शब्दात…”

मुंबई : थुकण्यावरून अजित पवार आणि संजय राऊत यांच्यांनी एकमेकांवर पलटवार करत प्रतिउत्तर दिले होते. मात्र, संजय राऊत यांनी अजित पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावर खेद व्यक्त केला आहे.

अजित पवार यांनी संजय राऊत यांना राजकीय नेत्यांनी बोलताना तारतम्य बाळगण्याचा सल्ला दिला होता. पत्रकारांनी संजय राऊत यांना अजित पवार यांचं विधान सांगितल्यावर राऊत यांनी “मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं”, असं जोरदार प्रत्युत्तर दिलं होते. तसंच “ज्याचं जळतं त्याला कळतं” असे म्हटले होते.

मात्र, या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त करत राऊत म्हणाले, “अजित पवार आणि माझा स्वभाव स्पष्ट बोलण्याचा आहे. त्यामुळे आम्ही बोलून जातो. महाराष्ट्रात संयमाने वागलं पाहिजे हे अजित पवार यांचं म्हणणं योग्य आहे. मी सहमत आहे. थुंकण्यासंदर्भात संजय राऊत यांनी खुलासा दिला असही अजित पवार म्हणाले. मला मात्र वेगळा प्रश्न विचारण्यात आला. मी त्यावर कडक शब्दात उत्तर दिलं याचा मला खेद वाटतो आहे.”

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय