Thursday, March 28, 2024
Homeराज्यSulochana Passed Away : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे निधन !

Sulochana Passed Away : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे निधन !

Sulochana Passed Away : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे आज निधन झाले. त्या 94 वर्षांच्या होत्या. मुंबईतील दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

श्वासोच्छवासाचा त्रास आणि वयोमानानुसार इतर आजारांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगी, नात- नातजावई असा परिवार आहे. सुलोचना यांच्या निधनाने मराठी-हिंदी चित्रपटसृ्ष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील एका पर्वाची अखेर झाली असल्याचे बोललं जात आहे.

शनिवारी, 3 जून रोजी सुलोचना यांची तब्येत बिघडली आणि अशा स्थितीत त्यांना काल रात्रीपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज त्यांची प्राणज्योत मावळली.

बेळगावमध्ये 30 जुलै 1928 रोजी जन्म झालेल्या सुलोचना यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात 1946 पासून केली. सुलोचना यांनी चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानासाठी 1999 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्याशिवाय, 2004 मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. 2009 मध्ये महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र भूषण’ त्यांना राज्याच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

भूमिका केलेले मराठी चित्रपट : सासुरवास (1946), वहिनीच्या बांगड्या (1953), मीठ भाकर, सांगते ऐका (1959), लक्ष्मी आली घरा, मोठी माणसं आदी गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका साकारली.

भूमिका केलेले हिंदी चित्रपट : जब प्यार किसीसे होता है, प्यार मोहब्बत, दुनिया, जॉनी मेरा नाम, अमीर गरीब, वॉरंट आणि जोशिला, दिल दौलत दुनिया, बहरों के सपने, डोली, कटी पतंग, मेरे जीवन साथी, प्रेम नगर, आक्रमन, भोला भला, त्याग, आशिक हूँ बहरों का आणि अधिकार, हीरा, झुला, एक फूल चार कांटे, सुजाता, मेहरबान, चिराग, भाई बहन, रेश्मा और शेरा आदींसह चित्रपटांमध्ये काम केले.

 हे ही वाचा :

अक्षय भालेराव या तरूणाचा जातीयवादी सनातनी विचारांच्या गुंडांनी केलेला खून – प्रकाश आंबेडकर

PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र हादरला : गावात भीम जयंती साजरी करता का?’ असा सवाल करत दलित तरूणाची हत्या

युवक/युवतींना उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी ! मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना आहे तरी काय ? वाचा सविस्तर !

राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंडेसह हे आहेत अधिकारी!

दहावीचा निकाल लागला, कोकण अव्वल तर “हा” विभाग सर्वात कमी

महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून भाजपाच्या महिला खासदाराचा मोदी सरकारला घराचा आहेर

महापुरूषांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘या’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय