सांगली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड-एक वादळ आयोजित राज्यस्तरीय ‘काव्यस्पर्धा’ या ऑनलाईन पद्धतीने समुहाच्या माध्यमातून काव्य स्पर्धेचे आयोजन शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी दिनांक १९ फेब्रुवारीला करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल छत्रपती राजाराम महाराज जयंती दिनी समुहाच्या वतीने जाहीर केला. या स्पर्धेत पद्मभूषण वसंतदादा पाटील इंजिनेरिंग कॉलेज बुधगाव (जि. सांगली) चे विद्यार्थी तुषार पोपट गुळीग ने चतुर्थ क्रमांक पटकाविला.
ही स्पर्धा काव्यस्पर्धा १ व २ या समूहात पार पडली. यामध्ये महाराष्ट्राच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यातून रचना प्राप्त झाल्या. या रचनांचे परिक्षण सुप्रसिद्ध कवयित्री रिया पवार (मुंबई ) आणि सुप्रसिद्ध गझलकार आनंद देवगडे (यवतमाळ ) यांनी केले.
काव्यस्पर्धा समुह १ मधून प्रथम क्रमांक नंदकिशोर कदम, द्वितीय क्रमांक वसुधा नाईक (पुणे), तृतीय क्रमांक प्रशांत बागुल व चतुर्थ क्रमांक प्रितम कुमार देवतळे, ओंकार राठोड, व सांगोला तालुक्यातील तुषार पोपट गुळीग यांना मिळाला. तसेच काव्यस्पर्धा समुह २ मध्ये सर्वोत्कृष्ट रामदास गायधने, उत्कृष्ट रझिया इस्माईल जमादार, प्रथम वर्षा मेंढे, व्दितीय संजय तांबे, तृतीय वर्षा फटकाळे वराडे व प्रोत्साहनपर गणेश निकम, राजश्री मराठे, भारती तिडके, निलिमा नरके, अमित वीर, सुनिता कपाळे, करुणा कंद, प्रतिमा काळे, वैशाली शंकर यांनी पटकाविले.
या स्पर्धेचे आयोजन समुहप्रमुख काव्यभुषण कवी विशाल इंगोले, राहुल गजभिये, तसेच संकलन कवी. अमित मंदा अनिल, कवयित्री आम्रपाली घाडगे, कवी बादल जोगे, योग काळे, तेजस्विनी खेडकर व ग्राफिक्स अनिकेत कुहिरे, ओजस केदार यांनी केले.