Monday, May 20, 2024
Homeजिल्हासाहिल पठाण यांची शिवसेना अल्पसंख्यांक सेल रत्नागिरी शहर प्रमुख म्हणून नियुक्ती

साहिल पठाण यांची शिवसेना अल्पसंख्यांक सेल रत्नागिरी शहर प्रमुख म्हणून नियुक्ती

रत्नागिरी (रफिक शेख) : रत्नागिरी शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ते साहिल पठाण यांची शिवसेना अल्पसंख्यांक सेलच्या शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे उद्योग मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी नुकतेच साहिल पठाण यांना नियुक्ती पत्र दिले.

साहिल पठाण रत्नागिरी शहरात सामाजिक, शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रात महत्त्वाचे योगदान आहे. युवकांशी त्यांचा मोठा संपर्क आहे. त्यामुळेच साहिल पठाण यांची शिवसेना अल्पसंख्यांक सेलच्या शहर प्रमुख पदी नियुक्ती केली आहे. या निवडीबद्दल शहरातील सर्व शिवसैनिकांमधून अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय