Rohit Pawar : पुरोगामी विचारांचा वारसा जपणारे नेतृत्व म्हणून शरद पवारांनी राज्य व देशात राजकारण केले. बारामतीच्या माळरानावर विकासाचे वेगवेगळे प्रकल्प आणण्याचे काम शरद पवारांनी केले. शरद पवारांना बारामतीच्या प्रचारात अडकवून न ठेवता आता आमदार रोहित पवार मैदानात आले आहेत. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे बारामती मतदारसंघात मिनिट to मिनिट प्रचार करत आहेत.
रोहित पवार (Rohit Pawar) यांनी निवडणूक लागल्यापासून आत्तापर्यंत प्रत्येक विधानसभा मतदारसंघानिहाय दौरा केला आहे. इंदापूर, दौंड, खडकवासला, पुरंदर या ४ मतदार संघात अधिक ताकतीने ते प्रचार करत आहेत. बारामती तालुक्यात प्रत्येक जिल्हा परिषद गटात नागरिकांच्या सोबत संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेत आहेत. रोहित पवार यांनी अनेक ठिकाणी प्रचार रॅली, कॉर्नर बैठका, जुण्या जाणत्या नेत्यांच्या भेटी अशा पद्धतीने मतदार संघात फिरत आहेत.
बारामती मतदार संघात अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर रोहित पवार निकराने लढताना पाहायला मिळत आहेत. रोहित पवार आपले बंधू युगेंद्र पवार यांना सोबत घेऊन प्रचार करत असल्याचे देखील काही ठिकाणी पाहायला मिळाले परिणामी पवार कुटुंबात तिसरी पिढी अजित पवारांच्या राजकीय वर्चस्वाला धक्का देणार का हे पहावे लागणार आहे.
बारामती मतदार संघावर सध्या देशाचं लक्ष आहे परिणामी रोहित पवार माध्यमांच्या केंद्रास्थानी असल्याचे देखील दिसून येत आहे. रोहित पवार आपल्या खास भाषण शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. युवा वर्गांच्या मागण्या सातत्याने आपल्या भाषणातून मांडत असल्याने त्यांना युवकांचा मोठा पाठिंबा देखील मिळत आहे. अश्यात ते भाजपाच्या प्रचार यंत्रणेवर जड होत असल्याचे दिसून येत आहे.
हे ही वाचा :
ब्रेकिंग : EVM बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
कांदा निर्यातीच्या धोरणावरून डॉ. कोल्हे यांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला
मोठी बातमी : माजी आमदार जे.पी.गावित यांना माकप कडून उमेदवारी जाहीर
मोठी बातमी : शिवसेना ठाकरे गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय आहेत घोषणा !
मोठी बातमी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा कोणकोणत्या केल्या घोषणा !
’महामानव विश्वकाव्य दर्शन काव्यसंग्रह’ निर्मितीसाठी साहित्य पाठविण्याचे बार्टीकडून आवाहन
शिरूर लोकसभेसाठी 46 उमेदवारांचे 58 अर्ज
देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहे तरी कोण ?, वाचा सविस्तर !
भुजबळांनी नकार दिल्याने, आढळराव पाटलांना उमेदवारी डॉ.अमोल कोल्हेंच्या विधानाने खळबळ
धक्कादायक : बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास