सिक्कीम : मध्य व उत्तर भारतात बिपरजॉय चक्रिवादळाने धुमाकूळ घातलेला असतानाच आता सिक्कीममध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. परिणामी राज्यातील अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याच्या घटना समोर आल्या आहे. भूस्खलनामुळं असंख्य रस्ते बंद पडले असून भारतीय लष्कराकडून मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.
पुरात अडकलेल्या साडेतीन हजार पर्यटकांची जवानांनी सुटका केली असून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचं काम जारी आहे. सिक्कीमच्या उत्तर भागात सर्वाधिक नुकसान झालं आहे. त्यानंतर आता लगतच्या राज्यांनीही सिक्कीममध्ये बचाव पथक पाठवण्याची तयारी केल्याची माहिती आहे. सिक्कीमच्या चुंगथांग भागात गेल्या आठवड्यापासून सतत मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळं डोंगरी भाग असलेल्या चुंगथांगमध्ये कालपासून अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याच्या घटना समोर आल्या आहे.
त्यानंतर भारतीय लष्कराने तातडीने मदत व बचावकार्य सुरू करत साडेतीन हजार पर्यटकांना सुखरुप बाहेर काढलं आहे. त्यानंतर राज्यातील अनेक प्रमुख महामार्ग बंद करण्यात आले आहे. परिणामी संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. त्यानंतर आता हेलिकॉप्टरद्वारे नागरिक आणि पर्यटकांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. लाचेन आणि लाचुंग जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नागरीक अडकले असून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न जारी आहे.
हे ही वाचा :
शहराचे नाव बदलून जिजाऊ नगर करण्यासाठी लोकचळवळ उभारणार – महेश बारणे
‘महाराष्ट्र मिशन ड्रोन’ प्रकल्पाला तत्वतः मान्यता; अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये
अलंकापुरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा
Video : सिक्कीममध्ये भयंकर भूस्खलन झाल्याने रस्ते बंद, जवानांकडून ३५०० पर्यटकांची सुटका
ब्रेकिंग न्यूज : MPSC मध्ये राज्यात तिसरी, पण मित्रासोबत फिरायला गेली अन् घात झाला ; वाचून हादराल
मुबारक भाई पठाण ठरले महाराष्ट्रातील पहिले मुस्लिम चोपदार
Heat wave : संपूर्ण देशात उष्णतेचा कहर, बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेत 44 ठार
नोकरीच्या बातम्या वाचा :
प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज
भारती सहकारी बँक पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
मुंबई येथे टपाल जीवन विमा अंतर्गत भरती; आजच करा अर्ज
आदिवासी व्यवहार मंत्रालय अंतर्गत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज
IIE : पुणे येथे भारतीय शिक्षण संस्था, कोथरूड अंतर्गत विविध पदांची भरती
RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती
UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती
नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती