Friday, May 17, 2024
Homeग्रामीणआंबे-पिंपरवाडी घाटातील रस्ता व संरक्षक भिंती दुरूस्त करा; सरपंच मुकुंद घोडे यांची...

आंबे-पिंपरवाडी घाटातील रस्ता व संरक्षक भिंती दुरूस्त करा; सरपंच मुकुंद घोडे यांची उपविभागीय अभियंत्यांकडे मागणी.

जुन्नर (प्रतिनिधी) :- आंबे-पिंपरवाडी घाटातील रस्ता व संरक्षक भिंती दुरूस्त करण्याची मागणी आंबे-पिंपरवाडी गावचे सरपंच मुकुंद घोडे यांनी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जुन्नर यांच्याकडे केली आहे

आंबे-पिंपरवाडी घाटातील रस्त्यासाठी करोडो रुपये खर्च करूनही निकृष्ठ दर्जाच्या कामांमुळे दरवर्षी पावसाळ्यात या घाटामधील रस्ता व संरक्षक भिंती तुटने, रस्ता वाहून जाणे यांसारखे प्रकार घडत असतात.

कळमजाई देवी येथील वळणावरील रस्ता सध्या अतिशय धोकादायक झाला आहे. येथे संरक्षक भिंत नसल्यामुळे ओढ्याचे पाणी रस्त्यावर येते आणि रस्ता वाहून जातो, त्यामुळे ते वळण अत्यंत धोकादायक बनले आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी  दोन ते तीन  अपघाताच्या घटना या ठिकाणी घडल्या आहेत. 

पावसाळा चालू होण्यापूर्वी या ठिकाणी रस्त्याचे व संरक्षक भिंतीचे काम न केल्यास पावसाळ्यात उरलेला रस्ताही धुवून जाण्याची शक्यता आहे. रस्ता धुवून गेल्यास आंबे, पिंपरवाडी, हातवीज, सुकाळवेढे या गावांचा तालुक्यापासून संपर्क पूर्णपणे तुटून मोठी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते.

त्यामुळे रस्त्याचे व संरक्षक भिंतीचे काम पावसाळ्यापूर्वी करण्याची मागणी आंबे-पिंपरवाडी गावचे सरपंच मुकुंद घोडे, पिंपरवाडीचे पोलिस पाटील विष्णु घोडे,  DYFI चे जुन्नर तालुका सचिव गणपत घोडे यांनी निवेदनाद्वारे उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जुन्नर यांच्याकडे केली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय