Friday, May 17, 2024
Homeजिल्हारत्नागिरी : दापोलीत 'आदिवासी कातकरी समाज भवन' उभारा, आदिवासी कातकरी संघटनेची मागणी

रत्नागिरी : दापोलीत ‘आदिवासी कातकरी समाज भवन’ उभारा, आदिवासी कातकरी संघटनेची मागणी

रत्नागिरी : दापोलीत ‘आदिवासी कातकरी समाज भवन’ उभारा, अशी मागणी अदिम आदिवासी कातकरी संघटनेच्या वतीने गेली सात वर्षे केले जात आहे. याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला जात असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

दापोलीत आदिवासी कातकरी समाज भवन उभारणीसाठी जिल्ह्यातील आदिम आदिवासी कातकरी संघटना व बिरसा क्रांती दल यांची आज बैठक संपन्न झाली. या सभेला बिरसा क्रांती दलाचे सुशीलकुमार पावरा तसेच आदिम आदिवासी कातकरी संघटनेचे जिल्हा सचिव चंद्रकांत जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. 

दापोलीत आदिवासी कातकरी समाज भवन बांधण्यासाठी सन 2016 पासून आदिवासी आदिम कातकरी संघटनेचा पाठपुरावा सुरू आहे. तहसीलदार दापोली यांच्या मार्फत नुकतेच या समाजभवनाविषयी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. आदिवासी समाजभवनासाठी दापोलीत आरक्षित जागा निश्चित झाली आहे. ती जागा जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे. आदिवासी समाजभवनाच्या कामासाठी रत्नागिरीचे आदिवासी कार्यकर्ते लवकरच जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिस्ञा यांची भेट घेणार आहेत. तसेच यासंदर्भात पालकमंञी रत्नागिरी  अनिल परब यांनीही लक्ष द्यावे, अशी मागणी आदिवासी बांधव अनिल परब यांना भेटून करणार आहेत.

या बैठकीस आदिम आदिवासी कातकरी संघटनेचे जिल्हा सचिव चंद्रकांत जाधव, दापोली तालुका अध्यक्ष विठोबा जगताप, तालुका सचिव महेश वाघमारे, कृष्णा हिलम, दामू पवार, कार्याध्यक्ष विठ्ठल निकम, सामाजिक कार्यकर्ता विकास निकम, राजेंद्र पवार, महेंद्र पवार उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय