आपल्याकडचे नेते मिंधे,गुजरातचा महाराष्ट्रावर डोळा
नेरळ:जगातील सर्व युद्ध जमिनीसाठी झाली आहेत. भुगोलाशिवाय इतिहास पूर्ण होत नाही. पूर्वी युद्ध हे जमिनी ताब्यात घेण्यासाठी होत होती. पण जमीन लढवून ताब्यात घेतली जात होती. तेव्हा लढाई तरी होत होती. त्यामुळे लोकांना कळत होते की, कोणतरी जमीन ताब्यात घेणार आहे. पण आता गुपचूप जमिनी विकत घेतल्या जात आहेत. शिवडी-न्हाव शिवा सागरी मार्ग तयार होत आहेत. तेव्हा मार्गाच्या आजूबाजूच्या जमिनी जातात. सध्या रायगडची देखील हीच परिस्थिती आहे”, असे राज ठाकरे म्हणाले.घराच्या जमिनीचा तुकडा हे तुमचे अस्तित्व आहे.
—बाहेरचे लोक जमिनी विकत घेणार ती माणसं आली की मराठी बोलायचे बंद होणार आहे. रायगड जिल्ह्याला मोठा धोका सतर्क राहा, जमिनी घालवू नका. पालघर, ठाणे , रायगड हातातून जात आहे. कोकण किनारपट्टीला मोठा धोका आहे. महाराजांनी सांगितले होते, आपला शत्रू समुद्रामार्गे येईल, समुद्रावर गस्त वाढवा. आपल्याकडे शत्रू समुद्रामार्गे आले, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी इशारा दिला. राज ठाकरेंच्या हस्ते मनसे सहकार शिबिराचे उद्घाटन नेरळ येथे दि.६ व ७ जानेवारी रोजी झाले त्यावेळी ते बोलत होते.
गुजरातचा महाराष्ट्रावर डोळा
गुजरातचा महाराष्ट्रावर डोळा आहे.आपली महानंदा डेअरी अमूल गिळंकृत करते का असा प्रश्न उभा आहे.सहकर चळवळ सांभाळायला अनेक ग्रेट माणसे आहेत. इतिहासाकडून शिकले पाहिजे. वर्तमान हातून निघून जाईल. मराठवाड्यात विहिरीला 800-900 फूट पाणी नाही. साखर कारखाने उभा करून ऊस लागवड होते, पाणी जास्त लागते. पाणी खेचल्यास मराठवाड्याचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार ,असे तज्ञ सांगत आहेत पण आम्हाला फरक पडत नाही. जमीन बरबाद होत आहे. वाळवंट झाल्यास ती जमीन पूर्ववत करायला 400 वर्ष लागतील, आपल्याकडचे नेते मिंधे असून ते पैशासाठी वेडे झाले आहेत.ते फक्त या पक्षातून त्या पक्षात उडय़ा मारतात, या मिंधे नेत्यांनी त्यांची मने आणि स्वाभिमान गहाण टाकला आहे,नेरळ येथे झालेल्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी बुलेट ट्रेन तसेच अन्य प्रकल्पावरून सरकारला जाब विचारला. ते म्हणाले, बुलेट ट्रेन, नवी मुंबई विमानतळ, शिवडी-न्हावाशेवा सेतू असे अनेक मोठे प्रकल्प सध्या सुरू आहेत. मात्र या प्रकल्पांच्या आजूबाजूच्या जागादेखील पद्धतशीरपणे विकत घेतल्या जात आहेत. ही लोपं कोण आहेत? पुढे ते त्यांचीच भाषा आपल्यावर लादतील.
असेही राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.
जाती जातीत भांडणे लावली जात आहेत
जाती जातीत भांडण लावली जात आहेत. मराठी माणूस एकत्र राहू नयेत यासाठी बाहेरचे प्रयत्न करत आहेत. आज ज्या प्रकारचे राजकारण सुरु आहे ते पाहता, महाराष्ट्राचे तुकडे पडायला वेळ लागणार नाही, नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे, इथल्या लोकांना कळत नाही महाराष्ट्रामधील सर्व चांगले बाहेर काढा नसेल निघत तर उद्ध्वस्त करा. असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) दिला.