पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणावर चौफेर टीका
ऐतिहासिक भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईत समारोप
Rahul Gandhi (दि. १७) : मणिपूरमधून निघालेली राहुल गांधी यांची यात्रा दोन महिन्यानंतर सुमारे ६७०० किमी प्रवास करून दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी या स्मारकस्थळी शनिवारी दाखल झाली. राहुल गांधी यांचे मुंबईत जोरदार स्वागत करण्यात आले. दरम्यान धारावी येथे न्याय यात्रेच्या दरम्यान राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या धोरणावर टीका केली.
राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले, देशातील सर्व महत्वाच्या कंपन्या, संपत्ती फक्त अदानी व अंबानी यांनाच विकल्या जात आहेत. धारावी तुमची हक्काची जमीन आहे परंतु दलालाच्या माध्यमातून ही जमीनही बळकावली जात आहे. धारावीची जमीन बळाकणाऱ्या अदानीच्या मागे देशाचे पंतप्रधान ईडी, सीबीआय, आयकर विभाग घेऊन उभे आहेत. धारावी पुनर्वसन प्रकल्प अदानीला देऊन पोलीस बळाचा वापर करुन स्थानिक धारावीकरांना हुसकावले जात आहे.
मोठे इव्हेंट करून काम होत नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाटते की फक्त एकाच व्यक्तीकडे ज्ञान आहे…शेतकरी, मजूर आणि बेरोजगार तरुणांना ज्ञान नाही.” अशी परिस्थिती देशात निर्माण करण्यात आली आहे. त्यांनी या सभेत इलेक्टोरल बॉन्ड हा जगातील सर्वात मोठा घोटाळा आहे, असे पुन्हा स्पष्ट केले.”थेट लढाई भाजप, मोदी यांच्या विरोधात नाहीच. आमची लढाई ही त्यांच्या विचारधारे विरोधात आहे, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे.
हिंदुस्थानात राहणाऱ्या सामान्य व्यक्तींचा विचारच केला जात नाही. देशातील शास्त्रज्ञाला जितके ज्ञान आहे तितकेच ज्ञान देशात कष्टकरी शेतकऱ्यांना आहे. पश्चिम बंगालमधील महिला बिडी कामगार ज्या पध्दतीने बिडी वळतात तशी बिडी आपल्या कोणालाच वळता येत नाही. हे त्या महिलेचे स्किल आहे. त्याचा आदर केला पाहिजे. असे राहुल गांधी म्हणाले.
मेक इन इंडिया आणि धारावी
धारावी म्हणजे कौशल्याचे केंद्र असून हेच खरे ‘मेक इन इंडिया’ आहे. धारावीतील कौशल्याला आर्थिक पाठबळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.त्यातून मेक इन इंडिया घडू शकते.मोठे इव्हेंट करून काम होत असल्याचे दाखवले जात आहे.अन्याय करणाऱ्या आणि द्वेष पसरवणाऱ्या मोदी सरकाला उखाडल्याशिवाय आता स्वस्थ बसू नका,असे आवाहन त्यांनी केले.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईत झाला. राहुल गांधी यांनी रविवारी सकाळी दक्षिण मुंबईतील मणीभवनपासून न्याय संकल्प यात्रा काढली.
यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस वेणुगोपाल, प्रियंका गांधी, मीडिया विभागाचे प्रभारी जयराम रमेश, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेत सतेज बंटी पाटील, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर AICC चे सचिव आशिष दुवा, सोनल पटेल आदी मान्यवर नेते होते.
हे ही वाचा :
धक्कादायक : पुण्यात दिवसाढवळ्या गोळीबार, एकाचा मृत्यू
कळपातून उधळलेला बैल थेट कारमध्येच घुसला; नंदुरबारमधील घटना
जुन्नर : मुलीच्या बालविवाह प्रकरणी आई-वडिल, नवरदेव, सासु-सासरे, भटजीसह 8 जणांवर गुन्हा
राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेची आज सांगता सभा
अधिसूचना ते मतमोजणी लोकसभा निवडणुकीचे संपुर्ण वेळापत्रक