Sunday, May 19, 2024
Homeग्रामीणघोडेगाव येथे राघोजी भांगरे यांचा स्मृतिदिन साजरा

घोडेगाव येथे राघोजी भांगरे यांचा स्मृतिदिन साजरा


घोडेगाव :
आदिम संस्था व एस.एफ.आय.आंबेगाव तालुका समितीच्या वतीने आदिम संस्था कार्यालय घोडेगाव येथे २ मे हा राघोजी भांगरे यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.

आद्यक्रांतिवीर म्हणून ओळखले जाणारे आदिवासी क्रांतिकारी राघोजी भांगरे यांनी महाराष्ट्रात सावकारशाही व इंग्रजांच्या विरोधात मोठा संघर्ष १८०५ – १८४८ दरम्यान केला होता.२ मे १८४८ साली इंग्रजांनी ठाणे  येथील कारागृहात राघोजी भांगरे यांना फाशी दिली.

या स्मृतिदिनी राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून एस.एफ.आय.चे पुणे जिल्हा अध्यक्ष अविनाश गवारी यांनी राघोजी भांगरे यांचा इतिहास थोडक्यात मांडला. व यावर चर्चा करण्यात आली.

यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे आंबेगाव तालुका उपाध्यक्ष राजेंद्र घोडे, एस.एफ.आय. चे अविनाश गवारी,समीर गारे,आदिम संस्थेचे अनिल सुपे,अर्चना गवारी इ.उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय