PV Sindhu : भारताची दिग्गज बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधूने पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics) मध्ये विजयी सुरुवात केली आहे. महिला एकेरीच्या एम ग्रुपमध्ये तिने मालदीवच्या फथिमथ नब्बा अब्दुल रझाकचा एकतर्फी पराभव केला. सिंधूने पहिला गेम २१-९ असा सहज जिंकला तर दुसरा गेम २१-६ ने जिंकत सामना केवळ २७ मिनिटांत संपवला.
सिंधूच्या (PV Sindhu) या विजयाने तिच्या तिसऱ्या ऑलिम्पिक पदकाच्या मार्गावर एक महत्वपूर्ण पाऊल ठेवले आहे. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक आणि २०२१ च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या सिंधूचा यावेळी सुवर्णपदकाचा मानस आहे.
या सामन्यात सिंधूने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्धी फथिमथ नब्बा अब्दुल रझाकला कोणतीही संधी दिली नाही. पहिल्या गेममध्ये सिंधूने केवळ १३ मिनिटांत २१-९ असा विजय मिळवला, तर दुसऱ्या गेममध्ये तिने १४ मिनिटांत २१-६ असा पराभव केला.
दहावी मानांकित सिंधूचा हा सामना तिच्या पुढील विजयांचा संकेत देतो. तिचा खेळाडू म्हणून आत्मविश्वास आणि कौशल्य पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) सलग तिसऱ्या पदकाच्या विजयाची शक्यता बळकट करतात.
हेही वाचा :
ओलंपिकमध्ये बलराज पंवारचे चमकदार प्रदर्शन, एकल स्कल्स हीटमध्ये चौथा क्रमांक
१० मीटर एअर रायफल मिश्रित स्पर्धेत भारताला धक्का
Typhoon : ‘गेमी’ चक्रीवादळ; फिलिपाईन्स, तैवान चीनमध्ये तडाखा
कोल्हापूर शहरात महापूर – 5,800 लोक सुरक्षित स्थळी
गुजरातमधून तडीपार झालेल्यांनी… शरद पवार यांचे अमित शाहांना चोख प्रत्युत्तर
दिग्दर्शक फराह खान यांच्या आई मेनका इराणी यांचे निधन
ब्रेकिंग : गौरी गणपती उत्सवानिमित्त मिळणार ‘आनंदाचा शिधा’
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळाअंतर्गत योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन