पूर्णा (परभणी) : डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवा संघटनेकडून आज २९ जानेवारी रोजी डी वाय एफ आय पूर्णा तालुक्याच्या वतीने अभ्यास शिबिराचे व निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचे आयोजन करण्यात आले होते.
अभ्यास शिबिरात ‘राष्ट्राच्या जडणघडणीत महामानवांची भूमिका व योगदान’ या विषयावर सोनपेठच्या प्रा. डॉ. संतोष रणखांब यांनी मांडणी केली तर प्रा. डॉ. आदिनाथ इंगोले यांनी ‘मार्क्सवाद व आंबेडकरवादातील सुसंवाद’ या विषयांवर आपले मत व्यक्त केले. या दरम्यान पूर्णा येथील मानसशास्त्राचे प्रा. राजेश पर्लेकर यांनी मानसिक आरोग्यावर मांडणी करीत डिप्रेशन स्किल्स चाचणी घेतली.
तसेच २२ जानेवारीला घेतलेल्या निबंध स्पर्धेच्या आज झालेल्या बक्षीस वितरणाच्या सत्रात परभणी स्थित विद्यार्थीमित्र व मार्गदर्शक प्रा. रफिक शेख सर यांनी आपल्या उर्जावान शैलीत विद्यार्थी व युवांना मार्गदर्शन केले.
जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे विजेते पुढीलप्रमाणे :
• शालेय गट :
प्रथम : पोर्णिमा चांदोजी गायकवाड (पूर्णा)
द्वितीय : श्रुती महेश कुलकर्णी (परभणी)
• महाविद्यालयीन गट :
प्रथम : सानिया जाकेर शेख (सोनपेठ)
द्वितीय : गंगाधर गणेश प्रजापती (पूर्णा)
• खुला गट :
प्रथम : संदीप संभाजी खंदारे (पूर्णा)
द्वितीय : गजेंद्र भीमसिंह ठाकूर (पूर्णा)
यावेळी अंबाजोगाईचे प्रा. प्रशांत मस्के, सोनपेठचे ज्ञानदेव सूर्यवंशी, पूर्णेचे RTI ऍक्टिव्हिस्ट महानंद एंगडे, परभणीचे ऍड. शोएब, डी वाय एफ आय च्या जि. उपाध्यक्ष क्रांती बुरखुंडे, जिल्हा कोषाध्यक्ष जय एंगडे, तालुकाध्यक्ष सचिन नरनवरे, तालुका सहसचिव अजय खंदारे तसेच संघटनेचे इतर १८ ते २० कार्यकर्ते आणि स्पर्धक व त्यांचे पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉम्रेड विश्वा दुथडे, प्रास्ताविक जिल्हासचिव कॉम्रेड नसीर शेख यांनी तर आभार प्रदर्शन कॉम्रेड अमन जोंधळे यांनी केले.
