Friday, May 17, 2024
Homeआंतरराष्ट्रीयसलग चौथ्या वर्षी पुणे विद्यापीठ देशातील 'टॉप-१०' विद्यापीठांच्या यादीत.

सलग चौथ्या वर्षी पुणे विद्यापीठ देशातील ‘टॉप-१०’ विद्यापीठांच्या यादीत.

(प्रतिनिधी) पुणे : देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या नॅशनल इस्टिट्युशनल रॅंकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) 2020 या वर्षाची यादी जाहीर झाली आहे. एनआयआरएफ यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सलग चौथ्या वर्षी पहिल्या दहामध्ये आपले स्थान कायम ठेवले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यापीठाचे स्थान एक क्रमांकाने उंचावले आहे. त्यामुळे देशातील विद्यापीठांच्या क्रमवारीत पुणे विद्यापीठ नवव्या स्थानावर आहे. 

      राष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठांच्या क्रमवारीत पहिल्या दहामध्ये स्थान पटकविणारे हे महाराष्ट्रातील एकमेव विद्यापीठ ठरले आहे. असे असले तरीही देशातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या गटात (ओव्हर ऑल) मात्र विद्यापीठाची कामगिरी घसरली आहे. या गटात यंदा विद्यापीठाचे नामाकंन दोन क्रमांकांनी घसरले असून, यंदा पुणे विद्यापीठ १९ व्या स्थानावर आहे.

     केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे ही नामाकंने दरवर्षी जाहीर करण्यात येतात. शैक्षणिक संस्थांचे रॅंकिंग ठरविताना विद्यापीठे, सर्व शैक्षणिक संस्था, अभियांत्रिकी महाविद्यालये, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय, स्थापत्यशास्त्र आणि कायदा अशा एकूण नऊ गट निश्‍चित केले आहेत. या संस्थांचा दर्जा ठरविताना वेगवेगळे निकष पाहिले जातात. 


 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे स्थान

– विद्यापीठाच्या यादीत यंदा ६१.१३ गुणांसह नवव्या स्थानावर

– गेल्यावर्षी ५८.४० गुण होते.

– सर्व संस्थांच्या गटात विद्यापीठाची क्रमवारी घसरली; यंदा १९ व्या स्थानावर

– गेल्यावर्षी सर्व संस्थांच्या गटात विद्यापीठ होते १७ व्या स्थानावर

 विद्यापीठाच्या क्रमवारीत पुण्यातील विद्यापीठे :-

– विद्यापीठाचे नाव : रॅंकिंगमधील स्थान

– सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : ९ वे

– सिंबॉयसिस इंटरनॅशनल (पुणे) : ४३ वे

– डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (पुणे) : ४६ वे

– भारती विद्यापीठ (पुणे) : ६३ वे


 अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या क्रमवारी पुण्यातील महाविद्यालये :-

 महाविद्यालयाचे नाव : रॅंकिंगमधील स्थान 

– अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) : ५० वे

– डिफेन्स इन्स्ट्यिुट ऑफ ऍडव्हान्स टेक्‍नॉलॉजी : ६४ वे

– भारती विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ) कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग : ९९ वे

महाविद्यालयांच्या रॅंकिंगमध्ये पुण्यातील एकच महाविद्यालय

राष्ट्रीय स्तरावरील महाविद्यालयाच्या रॅंकिंगमध्ये पहिल्या शंभर महाविद्यालयांमध्ये विद्येच्या माहेरघरातील केवळ फर्ग्युसन महाविद्यालय हे एकच महाविद्यालय आहे. या क्रमवारीत फर्ग्युसन महाविद्यालय ५७.०४ गुणांसह ४२ व्या क्रमांकावर आहे.

 राष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाला मिळालेल्या क्रमवारी बाबत आम्ही आनंदी आहोत. रैंकिंगसाठी असलेल्या निकषमध्ये विद्यापीठची कामगिरी समाधानकारक आहे. विशेषत: संशोधन आणि प्रकाशन यामधील कार्य उल्लेखनीय आहे.

-डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय