Monday, May 20, 2024
Homeआरोग्यकोरोनाराज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह कार्यालयातील ५ जणांना कोरोनाची लागण

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह कार्यालयातील ५ जणांना कोरोनाची लागण

(प्रतिनिधी):- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंडेसह त्यांच्या कार्यालयातील ५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, धनंजय मुंडे हे तिसरे मंत्री आहेत ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना देखील कोरोनाची लागण झाली होती, त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. सरकार मधील तिसऱ्या मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याने चिंता अधिक वाढली आहे. 

     गुरूवारी रात्री या सगळ्यांच्या चाचणीचा अहवाल आला. धनंजय मुंडे आज शुक्रवारी रूग्णालयात दाखल होणार आहेत. मुंडे यांच्यासह त्यांचे स्वीय सहायक, पीए, मुंबईतील वाहन चालक, बीडचे वाहनचालक आणि स्वयंपाकी यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र कोणालाही लक्षणे नाहीत. या आठवड्यात मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला मुंडे हजर होते. धनंजय मुंडे हे सोमवारी बीडहून मुंबईत परतले होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय