Saturday, April 27, 2024
Homeग्रामीणपुणे : सर्पदंश झालेल्या आदिवासी महिलेस उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू, डॉक्टरांवर कारवाई...

पुणे : सर्पदंश झालेल्या आदिवासी महिलेस उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू, डॉक्टरांवर कारवाई करण्याची किसान सभेची मागणी

राजगुरुनगर : डेहणे ( ता . खेड ) येथील प्राथमिक आरोग्य रुग्णालयात डॉक्टरांचा निष्काळजीपणा समोर येत असून रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. जनतेच्या जिवाशी चाललेला हा खेळ थांबावावा व दोषी वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभा वतीने एका निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी अजय जोशी यांच्याकडे केली आहे. 

सोमवार दिनांक 20 सप्टेंबर 2021 रोजी सखुबाई ज्ञानेश्वर वनघरे रा. भिवेगाव या आदिवासी महिलेला सर्पदंश झाल्याने त्यांना तात्काळ प्राथमिक रुग्णालय डेहणे या ठिकाणी उपचारासाठी नेण्यात आले. परंतु तेथे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्यांना तेथून प्राथमिक रुग्णालय घोडेगाव या सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी जाण्यास सांगण्यात आले. 

रुग्णाची अवस्था खूप नाजूक असताना पिडित कुटुंबास व रुग्णास रुग्णालयाने रुग्णवाहिका पुरवली नाही, असा आरोप किसान सभेने केला आहे.

पीडित कुटुंबाने आपल्या पेशंटला खाजगी गाडीने घोडेगाव या ठिकाणी तात्काळ हलवले. परंतु ग्रामीण रुग्णालय घोडेगाव मध्ये पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी सदर व्यक्ती मृत्यू झाल्याचे सांगितले.

प्राथमिक रुग्णालय डेहणे या रुग्णालयात निष्काळजीपणाच्या घटना डॉक्टरांकडून वारंवार होत आहेत. व त्याचा मोबदला म्हणून अनेक पेशंटला आपला जीव गमवावा लागतो. या प्रकारची निष्काळजीपणाची कामे थांबवावीत व या गोष्टीना आळा बसावा यासाठी अखिल भारतीय किसान सभा पुणे राजगुरूनगर यांनी अनेक वेळा पत्रव्यवहार करून प्राथमिक रुग्णालय डेहणे मध्ये डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी जो हा मृत्यूचा खेळत चालतो आहे त्यास आळा बसावा यासाठी तालुका व जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. व  सदर डॉक्टर व इतर कर्मचारी यांच्यावर ती योग्य ती कारवाई करावी अशा प्रकारचे निवेदने दिली होती. परंतु यावर कोणतीही कार्यवाही न केल्याने रुग्णांचा बळी जात आहे.

जनतेच्या जीवाशी चाललेला हा खेळ थांबावावा. व दोषी वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कडक कार्यवाही करावी, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभा पुणे व अखिल भारतीय किसान सभा राजगुरुनगर यांनी केली आहे.

निवेदन देतेवेळी अखिल भारतीय किसान सभा राजगुरूनगरचे अमोद गरुड, महेंद्र थोरात, विकास भाईक हे उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय