Monday, May 13, 2024
HomeआंबेगावPune : उद्या पायी रॅली; हिरडा प्रश्नावर सुरू असलेले आंदोलन तीव्र होणार

Pune : उद्या पायी रॅली; हिरडा प्रश्नावर सुरू असलेले आंदोलन तीव्र होणार

मंचर (पुणे) : जून २०२० साली झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे आदिवासी भागातील प्रमुख उत्पन्नाचा स्रोत व नगद रक्कम मिळवून देणाऱ्या हिरड्याची नुकसानभरपाई मिळावी यासाठी मंचर येथे तीन दिवस उपोषण सुरू आहे. तरीही निर्णय झालेला नाही. म्हणून उद्या रविवार दि. १८/०२/२०२४ रोजी आपण युवक व विद्यार्थी मिळून हरिश्चंद्र मंदिर, घोडेगाव ते मंचर पर्यंत पायी चालत येेणार आहेत. या पायी रॅली मध्ये सर्व संवेदनशील नागरिक व हिरडा उत्पादक शेतकरी, आणि युवक – विद्यार्थी या सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. Pune The ongoing agitation on the Hirda issue will intensify 

तसेच जर उपोषणकर्त्यांचा अधिक अंत पहिला व शेतकऱ्यांची फसवणूक केलीत तर आम्ही युवक येत्या निवडणुकीत सर्व गावागावात फिरून घर – घर पिंजून काढून येत्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांची सुद्धा आम्ही फसवणूक करून आमच्या एकजुटीची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाहीत.. असा निर्वाणीचा इशारा शासनाला व लोकप्रतिनिधींना देण्यात आला आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय