Sunday, April 28, 2024
Homeजिल्हापुणे : महिला आयोगाद्वारे १९,२० व २१ जुलै रोजी जनसुनावणी

पुणे : महिला आयोगाद्वारे १९,२० व २१ जुलै रोजी जनसुनावणी

पुणे, दि.१३ : राज्य महिला आयोगाच्या ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत १९, २० व २१ जुलै रोजी आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली जनसुनावण्या घेण्यात येणार आहेत.

१९ जुलै रोजी पुणे शहरची तर २० जुलै रोजी पुणे ग्रामीणची जनसुनावणी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, जिल्हा नियोजन भवन येथे होणार आहे. दुपारी ३ ते ५ या वेळेत आढावा बैठक घेण्यात येणार आहे.

पिंपरी चिंचवडची जनसुनावणी २१ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, चिंचवड महानगरपालिकेजवळ, पिंपरी येथे होणार आहे. दुपारी ३ ते ५ या वेळेत पिंपरी चिंचवड शहरातील आयोगाच्या विषयाबाबत आढावा घेतला जाणार आहे.

पिडित महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत व्हावी, कोणतीही पुर्वसूचना न देता थेट सुनावणीस उपस्थित राहून आपली लेखी समस्या मांडता यावी यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाव्दारे या जनसुनावणीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाच्या प्रशासकीय अधिकारी दीपा ठाकूर यांनी दिली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय