Friday, November 22, 2024
Homeजिल्हाPune : अनंतराव पवार महाविद्यालयात 'ग्रीन कॅम्पस प्रोग्राम' अंतर्गत वनस्पती उद्यानाचे उद्घाटन

Pune : अनंतराव पवार महाविद्यालयात ‘ग्रीन कॅम्पस प्रोग्राम’ अंतर्गत वनस्पती उद्यानाचे उद्घाटन

Pune / दिपाली पवळे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालयात दि. ०४ एप्रिल २०२४ रोजी टॉमटॉम इंडिया प्रा. लि. पुणे यांच्या सीएसआर फंडातून निसर्गराजा मित्र जीवांचे यांच्या वतीने ‘ग्रीन कॅम्पस प्रोग्राम’ अंतर्गत ‘वनस्पती उद्यान’ विकसित करण्यात आले. Pune News

या उद्यानाचे उद्घाटन श्रीमती दया ओगले (साईट प्रमुख, टॉमटॉम इंडिया प्रा. लि., पुणे), सागर शिंदे (डायरेक्टर, इंजिनिअरिंग क्लस्टर, पीसीएमसी), मा. मौमिता दास, व्यवस्थापक, टॉमटॉम इंडिया प्रा. लि., पुणे) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे, उपप्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे, पालक त्याचबरोबर निसर्गराजा मित्र जीवांचे या संस्थेचे सर्व मान्यवर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी निसर्गराजा मित्र जीवांचे या संस्थेच्या वतीने पक्ष्यांना पाणी पिण्याची पर्यावरणपूरक असणारी मातीची भांडी महाविद्यालयासाठी भेट म्हणून दिली. त्याच बरोबर कापडी पिशव्यांचा वापर करावा हा संदेश देण्यासाठी कापडी पिशव्यांचे उपस्थितांना वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. ज्ञानेश महाजन उद्यान विकसित करण्यामागील भूमिका आणि तिचे असणारे महत्त्व विशद करताना म्हणाले भारतीय जैवविविधतेच्या परंपरेचे संवर्धन करणे महत्त्वाचे असून संवर्धन करत असताना पर्यावरणातील कोणत्याही घटकाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच सह्याद्रीच्या परिसरात दुर्मिळ जैवविविधता आहे व तिचे संवर्धन होण्याची गरज आहे. इतर देशातील वनस्पतींकडून आपल्या मूळ भारतीय वनस्पतींवर होणारे आक्रमण हे देखील पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असल्याचे मत मांडले.

दया ओगले, सागर शिंदे यांनी टॉमटॉम इंडिया प्रा. लि., पुणे ही संस्था सीएसआर फंडातून करत असलेल्या विविध कार्याची माहिती देताना पर्यावरणपूरक काम, शैक्षणिक विकास, दर्जेदार शिक्षण, गरीब मुलांना शिष्यवृत्ती वाटप ही विविध कामे संस्थेच्या सीएसआर फंडाच्यामार्फत केली जात असल्याची माहिती दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे होते.

अध्यक्ष स्थानावरून त्यांनी परिसराची भौगोलिक माहिती देताना महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध पर्यावरणपूरक कार्यक्रमांची माहिती दिली. पुढे ते म्हणाले की, संस्थेच्या माध्यमातून विकसित केलेल्या उद्यानाचा विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधकांना निश्चितच उपयोग होणार आहे.

उद्यान विकसित करण्यासाठी प्रा. अक्षय शेटे, विशाल मोकाटे यांनीही परिश्रम घेतले. या उद्घाटन कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गणेश चौधरी यांनी केले, तर आभार उपप्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे यांनी मानले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : कल्याण लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीसांकडून उमेदवार जाहीर

वेळ पडल्यास उमेदवारांना हॅलिकॉफ्टरने आणू, हसन मुश्रीफ यांचे मोठे विधान

मोठी बातमी : श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान

अभिनेत्री कंगना रणौत झाली होती बारावीत नापास, आज भाजपची लोकसभेची उमेदवार

कंगना राणौतने भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून घेतले ‘यांचे’ नाव, लोक करताहेत ट्रोल

आरटीई कायद्यातील बदलाच्या आदेशाची प्रत जाळून पालकांनी केला निषेध!

संबंधित लेख

लोकप्रिय