Wednesday, July 3, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPune : गुलाबराव पाटील यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

Pune : गुलाबराव पाटील यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

पुणे / क्रांतीकुमार कडुलकर : सूर्योदय प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल खान्देश मराठा मंडळाचे माजी अध्यक्ष गुलाबराव पाटील यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. Pune

श्री.छत्रपती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय कोंढवा बुद्रुक पुणे याठिकाणी पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न झाला.त्यावेळी वयाच्या सत्तर वर्षांपर्यंत कंपनीत अतिशय मेहनतीने व प्रामाणिकपणे दिर्घ सेवेबद्दल चिंतामण पाटील यांना देखील शाल श्रीफळ व सन्मान पत्र देऊन उत्कृष्ट कामगिरी बद्दल गौरविण्यात आले. Pune news

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पुणे भा.ज पा कामगार जिल्हा उपाध्यक्ष किशोरअहिरे होते.यावेळी सुर्योदय प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा प्रतिभा पाटील, यशादाच्या माध्यम व प्रकाशन केंद्र विभाग प्रमुख डॉ.बबन जोगदंड, पद्मावती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजय दगडे, माजी नगरसेविका संगीता ठोसर, भारती पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे तसेच इतर अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. Pune news

यावेळी डॉ. बबन जोगदंड, गुलाबराव पाटील, किशोर अहिरे यांनी सुर्योदय प्रतिष्ठानचे आभार मानले.यावेळी विविध स्तरातील मान्यवर सुर्योदय प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन खटावकर यांनी केले.तर नरेश भाटिया यांनी आभार मानले.

whatsapp linkgoogle news gifहेही वाचा :मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या संदर्भात मंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देशधक्कादायक : लिफ्टमध्ये कुत्र्याला वॉकरने मारहाण; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैदधक्कादायक ! 19 वर्षीय तरुणाचा झोपेत चालताना सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू!मोठी बातमी : राज्यातील गट ‘क’ पदांच्या सर्व परीक्षा आता एमपीएसीद्वारेमोठी बातमी : आजपासून नवे फौजदारी कायदे लागू, वाचा काय होणार बदल !IDBI : आयडीबीआय बँक अंतर्गत मोठी भरती; आजच करा अर्ज!
ब्रेकिंग : जुलैच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपातनवीन फौजदारी कायद्यांमुळे न्यायव्यवस्थेतील अनुशेष कमी होण्यास मदत होईल – राज्यपाल रमेश बैसमोठी बातमी : भुशी धरणात एकाच कुटुंबातील ५ जणांचा बुडून मृत्यू, धक्कादायक Video व्हायरलमोठी बातमी : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती, वाचा कोण आहेत सुजाता सौनिक ?

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय