Monday, May 6, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPune: राजेंद्र भोसले यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान

Pune: राजेंद्र भोसले यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान

Pune/ आनंद कांबळे : रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्याचे यंदाचे पाचवे वर्ष आहे. यंदाच्या वर्षी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेंद्र भोसले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मा. सहा पोलीस आयुक्त भानूप्रताप बर्गे आणि रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. (pune)

पुरस्कार स्वीकारताना आयुक्त राजेंद्र भोसले म्हणाले की, प्रशासकीय अधिकाऱ्यांवर काम करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जास्त प्रभाव असतो. समाजाचे हित पर्यायाने लोकांचे हित जोपासण्याचे काम प्रशासकीय अधिकारी म्हणून करण्यासाठी मोठी संधी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून मिळते. महापुरुष सर्वच नागरिकांचे असतात, त्यांनी जन्म घेतलेल्या जातीमध्ये त्यांना बंदिस्त करणे चुकीचे आहे.

भानूप्रताप बर्गे म्हणाले की, पुणे मनपाचे नवनिर्वाचित आयुक्त म्हणून पदभार स्वीकारताना राजेंद्र भोसले यांनी अत्यंत उत्कृष्टरीत्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे नियोजन केले. महापुरुषांची जयंती साजरी करत असताना सर्व नियोजन दर्जेदार असावे, मोठ्या उंचीचे असावे हा दृष्टिकोन यावर्षी प्रकर्षाने दिसून आला. राजेंद्र भोसले यांनी याआधीही प्रशासकीय पदांवर असताना सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू म्हणून काम केलेय ते मला जास्त भावलेले आहे, योग्य व्यक्तीला पुरस्कार प्रदान केल्याचे समाधान असल्याचे बर्गे म्हणाले.

रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले की, परिषदेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार याआधीही दर्जेदार व्यक्तिमत्त्वांना दिलेला आहे. पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले यांच्या रूपाने समस्त पुणेकरांनाच हा पुरस्कार प्रदान केल्याचे समाधान आहे.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सहा. पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड तर कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन अपर्णा मारणे साठ्ये यांनी केले होते. यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कदम, आशिष गांधी आणि रुग्ण हक्क परिषदेचे रवींद्र चव्हाण उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

सोन्याच्या दर मोठी घसरण; जाणून घ्या नवीन दर

मनोज जरांगे पाटलांवरील चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात

ब्रेकिंग : सभेच्या मैदानासाठी बच्चू कडूंचा राडा, पोलिसांनीच भाजपचे गमचे…

मोठी बातमी : पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय, वाचा काय आहे कारण !

मोठी बातमी : MDH आणि Everest च्या काही मसाल्यांवर बंदी

खासदार श्रीरंग बारणे यांचा अर्ज दाखल

राज्यातील 11 मतदारसंघात २५८ उमेदवार रिंगणात

ब्रेकिंग : मतदान यादीत नाव नोंदविण्याची आज शेवटची तारिख, असा करा अर्ज !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय