Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPune : पुणे शहरात अनधिकृत पब्ज, बार धडक (Bulldozer action) कारवाई

Pune : पुणे शहरात अनधिकृत पब्ज, बार धडक (Bulldozer action) कारवाई

पुणे : पुण्यातील पोर्शे अपघातानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे महानगरपालिका, पीएमआरडीए यांनी अनेक पब, बार, आणि रूफटॉप हॉटेल्सवर कारवाई केली आहे. PUNE

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने फर्ग्युसन रोड वरील एल थ्री पब, सह वडगाव बुद्रूक येथील हॉटेल द अर्बन हारवेस्ट, खराडीतील ७ अ रेस्टॉरंट, माफिया बार, स्पाईन फॅक्टरी, आयन बार बालेवाडी हायस्ट्रीट, द अर्बन फँड्री, टेटूलिया बेरिस्टो, नबाब एशिया, बटर अँड बार, हॉटेल ग्रीन सिग्नल, सुप्रिम स्नॅडविच कॉर्नर जंगली महाराज रस्ता, चैतन्य पराठा, हॉटेल वैशाली यासह २९ ठिकाणी कारवाई करून ३६ हजार ८४५ चौरस फुटाचे बांधकाम पाडून धडक कारवाई केली आहे. pune news

ड्रॅग फ्री सिटी बनवा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

पुणे शहरातील बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी. अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध नव्याने कठोर कारवाई सुरु करावी. यासंदर्भातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवून कठोर कारवाई करावी. पुणे शहराला अमली पदार्थमुक्त शहर करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

पुणे जिल्ह्यासह पिंपरी चिंचवड मध्येही प्रशासन कठोर कारवाई करणार

सर्व कायदे कायदे धाब्यावर बसवून पब आणि बार मध्ये मद्यरात्री धिंगाणा सुरू असतो, बेधुंद तरुणाईला असंस्कृत बनवणाऱ्या अल्पवयीन मुलांना दारू विक्री करणाऱ्या या पब आणि बार संस्कृती मुळे नागरिक वैतागलेले आहेत. pune news

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRD), पुणे, पिंपरी चिंचवड हद्दीतील उर्वरित सर्व पब, बार व रेस्टॉरंट्स यांचा सर्व्हे चालू असून अनधिकृत पब्ज,बार यांनी कायद्याचे पालन केले नाही तर त्यांच्यावरही बुलडोझर फिरवण्यात येतील, असे सूत्रांकडून समजले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

विरोधी पक्षनेते राहुल गांधींना मिळणार अनेक अधिकार, मोदी सरकारची होणार अडचण !

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु

१ हजार ९१० आशा सेविकांचे मोबाईल सुविधेतून सक्षमीकरण

अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

२ जुलैपर्यंत नामनिर्देशन पत्रे दाखल करता येणार – जितेंद्र भोळे

मुख्यमंत्र्यांच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या भूमिपूजन दरम्यान मोठी दुर्घटना टळली

मोठी बातमी : देशात एँटी पेपर लीक कायदा लागू, मध्यरात्री अधिसूचना जारी, वाचा काय आहे कायदा !

NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय