जुन्नर : निसर्ग चक्रीवादळात जून २०२० साली जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील हिरडा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. ही नुकसान भरपाई मिळावी म्हणून किसान सभेच्या नेतृत्वाखाली मागील चार वर्षे आंदोलन व या प्रश्नाचा पाठपुरावा सुरू आहे. अखेर किसान सभेच्या लढ्याला यश आले आहे. दि.25 फेब्रुवारी रोजी, झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हिरडा नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Pune : Big success for Kisan Sabha’s four-year struggle
किसान सभेचे दि.१५ फेब्रुवारी पासून उपविभागीय कार्यालय मंचर येथे बेमुदत उपोषण सुरू होते. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत गावपातळीवर विविध आंदोलने सुरू केली होती. शेकडो विद्यार्थ्यांनी घोडेगाव ते मंचर असे १५ किमी पायी चालत या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.
या सर्व आंदोलनाची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवनेरीवर शिवजयंतीच्या कार्यक्रमावेळी हिरडा नुकसान भरपाई देवू अशी घोषणा केली व उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडावे असे आवाहनही केले होते.
दि.२० फेब्रुवारी रोजी राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन तर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उपोषणकर्त्यांशी फोनवर संवाद साधून उपोषण स्थगित करण्याचे आवाहन केले होते. तर किसान सभेचे शिष्टमंडळ यांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनीही उपोषण स्थगित करण्याचे आवाहन केले होते. व हा प्रश्न या कॅबिनेटमध्ये नक्की मार्गी लागेल असे आश्वासित केले होते.
या सर्व पार्श्वभूमीवर किसान सभेचे सहा दिवसांपासून सुरू असलेले उपोषण स्थगित करून बेमुदत धरणे आंदोलन मंचर प्रांत कार्यालय येथे सुरु होते.ज्ञदि.25 फेब्रुवारी रोजी, झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत, हिरडा नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा किसान सभेेचा ऐतिहासिक विजय आहे.
या निर्णयामुळे आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील 65 गावातील सुमारे 3865 शेतकरी बांधवाना सुमारे 15 कोटी 48 लाख रुपयांची मदत मिळणार आहे. मंत्रीमंडळ बैठकीत झालेला निर्णय राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फोन करून किसान सभेचे पदाधिकारी यांना आंदोलनस्थळी सांगितले. व थोड्याच वेळात मंत्रीमंडळ बैठकीचे मिनिट्स ही किसान सभेस उपलब्ध झाले.
या निर्णयाचा आनंद साजरा करत किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी पेढे एकमेकांना भरवत आंनद साजरा केला. व सुरु असलेले बेमुदत धरणे आंदोलन स्थगित केले.
यावेळी किसान सभेचे अँड. नाथा शिंगाडे, डॉ. अमोल वाघमारे, विश्वनाथ निगळे, अशोक पेकारी, राजू घोडे, लक्ष्मण जोशी, गणपत घोडे, रामदास लोहोकरे, आमोद गरुड, कृष्णा वडेकर,विकास भाईक, महेंद्र थोरात, संतोष कांबळे, दत्तू बर्डे, कमल बांबळे, दत्ता गिरंगे, अशोक जोशी, भिमाबाई लोहकरे, नारायण वायाळ, डॉ. मंगेश मांडवे तसेच राष्ट्रवादी पक्षाचे नेते प्रकाश घोलप, नंदकुमार सोनावळे, प्रदीप आमोंडकर, जितेंद्र गायकवाड, शिवसेनेचे अमोल अंकुश इ. उपस्थित होते.
VVCMC : वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत भरती
Pulgaon : केंद्रीय विद्यालय पुलगाव अंतर्गत विविध पदांसाठी भरती
Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती