Wednesday, May 22, 2024
Homeताज्या बातम्याPUNE:श्री वैश्य सुथार पुना चॅरिटेबल ट्रस्टच्या उपक्रमांना समाज बांधवांनी सहकार्य करावे- मुकेश...

PUNE:श्री वैश्य सुथार पुना चॅरिटेबल ट्रस्टच्या उपक्रमांना समाज बांधवांनी सहकार्य करावे- मुकेश चुडासमा

पुणे/ क्रांतीकुमार कडूलकर:यंदाच्या वर्षी श्री वैश्य सुथार पुना चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पुणे येथे विश्वकर्मा जयंती एकत्रित येवून साजरी करण्यात आली. गेली अनेक वर्षे पिंपरी चिंचवड शहरात साजरी करण्यात येत होती. यंदाच्या वर्षी पुणे येथे साजरी करण्यात आली.श्री वैश्य सुथार समाजाचे अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजाचे अध्यक्ष मुकेश चुडासमा यांच्या पुढाकाराने व चॅरिटेबल ट्रस्ट कमिटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजाचे अध्यक्ष मुकेश चुडासमा या कार्यक्रमास उद्देशून म्हणाले, समाजातील सर्व स्तरावरील सर्वांगीण विकासासाठी समाज बांधवांनी पुढाकार घेवून गरजू मुला-मुलींच्या शिक्षणासाठी व गरजूंच्या आरोग्यासाठी मदत करावी. तसेच, संस्था यासाठी सदैव पाठीशी प्रयत्नशील राहील.
यावेळी मुकेश चुडासमा यांनी समाज बांधवांचे विशेष आभार मानले.कार्यक्रम उपस्थित मान्यवर प्रविण वाढीया,आदित्य चुडासमा,विपुल वाढीया, करण पढीयार,रमेश पढीयार,प्रतिक सुद्रा, नटवरलाल काटेलिया,शैलेश काटेलिया,यग्नेश काटेलिया,हिरेन वाढीया तसेच,महिला जयाबेन वाढीया,भानु चुडासमा,धर्मिष्ठा वाढीया,भारती वाढीया,भुमी सुद्रा,भारती वाढीया,भगवती सुद्रा, लता काटेलिया,वनिताबेन काटेलिया, जयाबेन काटेलिया, भाविसाबेन रावलिया, जयश्री पढीयार, मिनल काटेलिया आदी उपस्थितांच्या वतीने कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यात आला

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय