जुन्नर / (आनंद कांबळे) : आपटाळे बीटस्तरीय सहविचार सभा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानगाव येथे गुरुवार दि. 12 सप्टेंबर 2024 रोजी उत्साहात संपन्न झाली.
या सभेसाठी उच्छिल, आपटाळे, तांबे व इंगळून या चार केंद्रांतील एकूण 34 शाळांचे शिक्षक सहभागी झाले होते. यामध्ये एकूण 32 महिला शिक्षिका व 55 पुरुष शिक्षकांचा समावेश आहे. या सर्वांनी आपटाळे बीटचा ड्रेसकोड उपक्रम अंतर्गत समान पोशाख परिधान करून एकजुटीचा व समानतेचा संदेश दिला असून या सभेची ही वैशिष्ट्यपूर्ण बाब ठरली आहे.
महिला शिक्षिकांसाठी अबोली रंगाची साडी व जॅकेट तर पुरुष शिक्षकांसाठी पांढरा शर्ट, काळी पॅन्ट व जॅकेट असे ड्रेसकोड चे स्वरूप असून स्वखर्चाने सर्वांनी हा खरेदी केला आहे. हा ड्रेसकोड बीटस्तरीय केवळ सभा-संमेलने, शिक्षण परिषदा, विविध स्पर्धा इत्यादींसह शाळा, केंद्र व तालुका स्तरावरील विविध शैक्षणिक कार्यक्रमांसाठी तसेच शाळा स्तरावर ऐच्छिक स्वरूपात आठवड्यातून एका दिवशी परिधान केला जाणार आहे. एक सारखा पोशाख सर्वांनी परिधान केल्यामुळे सभेमध्ये एक वेगळे चैतन्य व आनंदी वातावरण दिसून आले.
यावेळी आपटाळे बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी संचिता अभंग यांनी प्रशासकीय विविध विषय, शालेय गुणवत्ता वाढ, शिष्यवृत्ती परीक्षा, अभ्यास पूरक व सहशालेय उपक्रम, हस्ताक्षर सुधार, इंग्रजीअध्ययन समृद्धी उपक्रम, विविध स्पर्धा सहभाग, अभिलेखे अद्ययावतीकरण, शालेय भौतिक सुविधांची उपलब्धता, लोकसहभाग, विविध स्वयंसेवी संस्थांची शालेय विकासात मदत इत्यादी विषयांबाबत मार्गदर्शन केले.
पुणे (Pune) जिल्हा परिषद पुणे अंतर्गत अध्यक्ष चषक सन-२०२४ स्पर्धेत उच्च प्राथमिक गटामध्ये तृतीय क्रमांकाचा पुरस्कार नुकताच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उच्छिलला जाहीर झाला आहे. याबद्दल मुख्याध्यापक श्री अन्वर सय्यद व सर्व शिक्षकवृंदांचा बीटच्या वतीने सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार प्राप्त करणारी आदिवासी दुर्गम भागातील आपटाळे बीटमधील ही प्रथम अध्यक्ष चषक प्राप्त शाळा असून यापुढील काळात इतर शाळांना ही बाब उत्कृष्ट काम करण्यासाठी निश्चित प्रेरणादायी ठरेल.
यादिवशी सकाळ सत्रात शाळा करून दुपार सत्रात सदरची सभा घेण्यात आली. सभेचे नियोजन केंद्रप्रमुख सुरेश भवारी व पुष्पलता पानसरे यांनी केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदीप बोंबले, संपर्क फाउंडेशनचे दीपक चव्हाण, विशेष शिक्षिका रोहिणी गडदे, विविध शिक्षक संघटना प्रतिनिधी मध्ये खंडेराव ढोबळे, बाळासाहेब लांघी, सुभाष मोहरे, रमेश सावळे, जयसिंग मोजाड, पुनम तांबे उपस्थित होते. संतोष पानसरे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक सुनील घोलप
यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Pune
हेही वाचा :
संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग
ड्रायव्हींग लायसन्सच्या ‘स्मार्ट कार्ड’ रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत
धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती
ब्रेकिंग : मलायकाच्या वडिलांची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
शेतात काम करताना विद्युत तारेचा स्पर्श, चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू
JCI : ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती