Sunday, May 19, 2024
Homeराष्ट्रीयशांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवरील दडपशाहीचा जाहीर निषेध - SFI

शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवरील दडपशाहीचा जाहीर निषेध – SFI

कोल्हापूर : देशभरात सध्या शेतकरी आणि शेतकरी संघटना, विशेषतः पंजाब आणि हरियाणा मधील शेतकरी अन्यायकारक अशा शेती सुधारणा विधायक, २०२० च्या विरोधात निषेध करण्यासाठी दिल्ली कडे आगेकूच करत आहेत. ‘चलो दिल्ली’ चा नारा देत त्यांनी पंजाब मध्ये निषेध नोंदवला आहे आणि आता राजधानी दिल्ली कडे आगेकूच करत आहेत. सरकारने केलेल्या दडपशाहीचा स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया कोल्हापूर जिल्हा कमिटीने निषेध व्यक्त केला आहे. 

किमान समर्थन मूल्य (Minimum Support Price)  ची ग्वाही मिळावी, मंडीच्या व्यवस्थेचे खाजगीकरण करू नये, उत्पादन शिल्लक राहिल्यास अथवा विकत न घेतल्यास सरकारने विकत घ्यावे इत्यादी मागण्यांसह शेतकरी निषेध करत आहेत. 

             

पास झालेले शेती सुधारणा विधेयक या सर्व गोष्टींची पूर्तता करत नसल्याने शेतकरी व किसान संघटना शांततापूर्ण निषेध करत होत्या. मात्र दिल्ली कडे आगेकूच करताना दिल्ली – हरियाणा सीमा बंद केली गेली. शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला गेला, टिअर गॅस, वॉटर कॅननचा वापर केला गेला. भूमिपुत्र, अन्नदाता म्हणल्या जाणाऱ्या शेतकऱ्याची ही अवस्था ह्या नव्या भारतात होत आहे, असे एसएफआय जिल्हाध्यक्ष सर्वेश सवाखंडे म्हणाले.

    

प्रसिध्दी पत्रकाद्वारे जिल्हा सचिव रत्नदीप सरोदे, विनय कोळी, स्वप्नील इदे, मालोजीराव माने यांनी निषेध व्यक्त केला आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय