पुणे / क्रांतिकुमार कडुलकर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे, फरासखाना पोलीस स्टेशन, पुणे व बाल कल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २८ जुन २०२३ रोजी बुधवार पेठ, पुणे येथे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थिती मुख्य अतिथी सोनल पाटील सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे , राणी खेडेकर उपायुक्त बाल कल्याण समिती, फरासखाना पोलीस स्टेशन चुडप्पा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व अंभग सहायक पोलीस निरीक्षक, आशा भट्ट मंथन फाउंडेशन अध्यक्षा , कविता सुरवसे प्रकल्प व्यवस्थापक व अलका गुजनाल अलका फाउंडेशन, सुरेश कालेकर कोषाध्यक्ष पुणे सार्वजनिक सभागृह तसेच सामाजिक संस्थेचे पदाधिकारी अनिता उबाळे, पुष्पा जोरी, सुवर्णा पोटफोटे उपस्थित होते.
सामाजिक संस्थांनी महिला व मुलांसाठी काम करताना येणाऱ्या अडचणी मांडल्या. विधी सेवा प्राधिकरण, बाल कल्याण समिती व पोलीस यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमास देह विक्रय करणाऱ्या महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले.
‘ट्रॅक कंपोनन्ट्स’च्या कामगारांना तब्बल साडेबारा हजारांची वेतनवाढ !
ज्येष्ठ नागरिक त्रिवेणीनगर संघाचा 14 वा वर्धापन दिन संपन्न
संभाजी ब्रिगेडच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन