पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:येत्या २६ जानेवरीच्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनामध्ये पायल गोखले यांच्या विद्यार्थिनी कथक नृत्य सादर करणार आहेत.
गेल्या दोन वर्षापासून 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे कर्तव्य पथावर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित होणाऱ्या परेडमध्ये शास्त्रीय नृत्याचा समावेश करण्यात आला आहे. या परेडमध्ये नृत्य करण्यासाठी यावर्षी संपूर्ण भारतातून निवड प्रक्रिया घेण्यात आली होती. चिंचवडकरांसाठी ही नक्कीच अभिमानाची बाब आहे की, चिंचवड येथून प्रथमच, पायल नृत्यालयाच्या विद्यार्थिनी तोषवी दळवी, मानसी भागवत, वैष्णवी सपकाळ, श्रिया चक्रदेव, अनुष्का अलोनी आणि श्रावणी शाळीग्राम यांची कथक नृत्य करण्यासाठी निवड झालेली आहे. या परेड करिता सर्व मुली दिल्लीला रवाना झालेल्या आहेत. एक महिना त्यांना तिथे परेड संबंधी सर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती पायल नृत्यालयाच्या संचालिका आणि कथक नृत्यांगना पायल गोखले यांनी दिली.