Saturday, May 4, 2024
Homeक्राईमहुंड्यासाठी विवाहितेला शेततळ्यात बुडवून मारले! बारामती तालुक्यातील घटना! पती, सासू, नणंदेसह तिच्या...

हुंड्यासाठी विवाहितेला शेततळ्यात बुडवून मारले! बारामती तालुक्यातील घटना! पती, सासू, नणंदेसह तिच्या पतीलाही अटक!

बारामती : नवविवाहितेला हुंड्यासाठी दोन्ही हात बांधून शेततळ्यात बुडवून मारल्याबद्दल बारामती तालुक्यातील पळशी येथील चौगाव विरुद्ध पोलिसांनी खुनाचा व हुंडा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून पती सासू नणंद व नंणदेचा पती या चौघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

या घटनेने बारामती तालुक्यात खळबळ उडाली असून वडगाव निंबाळकर पोलिसांनी याप्रकरणी पती भाऊसाहेब महादेव गडदरे, सासु ठकुबाई महादेव गडदरे नणंद सौ.आशा सोनबा कोकरे व तिचा पती सोनबा चंदर कोकरे या चौघां विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील गिरिम येथील नामदेव बबन करगळ यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली होती. 24 डिसेंबर रोजी मासाळवाडीच्या भगवान बिरा गडदरे यांच्या शेतातील शेततळ्यात त्यांची विवाहित मुलगी सुरेखा भाऊसाहेब गडदरे हिचा मृतदेह आढळून आला. वरील चौघा आरोपींनी तिच्या घराशेजारी असलेल्या शेततळ्यामध्ये सुरेखा हिचे दोन्ही हात बांधून तिला शेततळ्यात बुडवून मारले अशी फिर्याद तिचे वडील करगळ यांनी पोलिसांकडे दिली त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

सोर्स महान्यूज

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय