Sunday, May 19, 2024
HomeNewsपत्रकार वागळें यांच्या वरील भ्याड हल्ल्याचा आळंदीत निषेध

पत्रकार वागळें यांच्या वरील भ्याड हल्ल्याचा आळंदीत निषेध

आळंदी/अर्जुन मेदनकर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री विश्वंभर चौधरी आणि विधीतज्ञ श्री असीम सरोदे यांच्या समवेत निर्भय बनोच्या सभेला जात असताना ज्येष्ठ पत्रकार श्री निखिल वागळे यांच्यावर अर्ध्या तासात चारवेळा पुण्यात झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद,पुणे जिल्हा संलग्न,हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ खेड तालुका यांचे वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
पत्रकार वागळें यांच्या वरील या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करून निवेदन देण्यात आले. आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) रमेश पाटील यांनी हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ, खेड तालुका अध्यक्ष अर्जुन मेदनकर यांचे हस्ते निवेदन स्वीकारले.या प्रसंगी गौतम पाटोळे,भागवत काटकर,बाबासाहेब भंडारे,राजेश नागरे,सोमनाथ बेंडाले आदी उपस्थित होते.भविष्यात असे हल्ले होऊ नये. या साठी पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची प्रभावी अंबलबजावणी करण्यात यावी. तसेच संबंधित पुण्यातील घटनेची चौकशी होऊन संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी या वेळी निवेदनातून करण्यात आली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय