Sunday, May 19, 2024
Homeग्रामीणअंंनिस आणि भाकपचे कार्यकर्ते प्रियांका व सुधीर सत्यशोधक पद्धतीने विवाहबद्ध

अंंनिस आणि भाकपचे कार्यकर्ते प्रियांका व सुधीर सत्यशोधक पद्धतीने विवाहबद्ध

हळदी (कोल्हापूर) : आज गुरुवार दि. 24 रोजी तारळे खुर्द येथील अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यां कवयित्री प्रियांका दत्तात्रय कांबळे आणि करवीर तालुक्यातील हळदीचे सुधीर रघुनाथ कांबळे हे  सत्यशोधक पद्धतीने विवाहबद्ध झाले. त्यांना  सत्यशोधक आचरणाची शपथ प्रा. डॉ. छाया विलास पोवार यांनी दिली.

 

वधू – वरांच्या हस्ते फुले-शाहू-आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, तथागत गौतम बुद्ध, सावित्रीबाई अशा महामानवांचे प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

तेजस्वीनी पांचाळ हिने पाहुण्यांची ओळख करून दिल्यानंतर छाया पोवार यांनी सत्यशोधक विवाह पद्धतीची माहिती सांगितली. वधू – वरांनी परस्परांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर मित्र व नातेवाईकांनी पुष्पवृष्टी केली आणि सोहळा संपन्न झाला. सत्यशोधक पद्धत अवलंबून वधूवरांनी आणि त्यांच्या मातापित्यांनी समाजासमोर आदर्श ठेवल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

विवाहसोहळ्यासाठी प्राचार्य डाॅ. विलासराव पोवार, कॉम्रेड अनिल चव्हाण, संजय पाटील, बाबुराव शिरसाठ, साताप्पा कांबळे, वनकुद्रे,  ग्रामपंचायत सदस्य प्रशांत कांबळे, दयानंद कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय