मुंबई : पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. हा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारला टिकेला सामोरे जावे लागल्याने हा निर्णय झाल्याचे बोलले जात आहे.
पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. ठाकरे सरकारने हा मोठा निर्णय घेतला. पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयामुळे बराच वाद झाला होता. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय स्थगित करण्यात आला. या निर्णयावरुन राज्य सरकारवर टीका होत होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला एक पाऊल मागे घ्यावे लागले.
विविध समाजातून या निर्णयाचे स्वागत !
पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा हा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारला टिकेला सामोरे जावे लागले. बहुसंख्य जनतेचा रोष ओढवून घेण्यापेक्षा सरकारने एक पाऊल मागे घेतले आहे. या निर्णयाचे राज्यातून स्वागत होत असून राष्ट्रीय आदिवासी अधिकार मंच, आरक्षण हक्क संरक्षण समिती, दलित – आदिवासी अधिकार मंच, बिरसा क्रांती दल यांसह विविध संघटनांनी मागणीला यश आले असल्याचे म्हटले आहे.