सुरगाणा (दौलत चौधरी) : सध्या सोशल मीडियावर ‘पोरगे भात लावये येजो’ हे गाणं चर्चचा विषय ठरत आहे. आदिवासी भागातील भात लावणीवर आधारित हे गाणं चित्रित करण्यात आले आहे. आतापर्यंत युट्यूबवर हे गाणं १ लाख २० हजारच्या वर लोकांनी पाहिले आहे. हे गाणे जिल्ह्यातील आदिवासी भाग पेठ, सुरगाणा तसेच कळवण तालुक्यात सोशल मीडियावर खूप शेयर केले जात आहे. या गाण्यातील सर्व कलाकार हे सुरगाणा तालुक्यातील आहेत. तर या गाण्याचे चित्रीकरण सुरगाणा तालुक्यातील चिंचला, राशा, भोरमाळ गावात झाले आहे. या गाण्यामध्ये योगेश चौधरी व काजल गावित यांनी अभिनय केला आहे. या गाण्याचे गायन भावेश बागुल यांनी केलं आहे. छायाचित्रिकरण हरेश बागुल व गणेश बागुल यांनी तर एडिटिंग माधव गावित व योगेश गावित यांनी केली आहे. या गाण्याची निर्मिती मनीषा महाले यांनी केली आहे.
आदिवासी संस्कृती या गाण्याच्या माध्यमातून जपण्याचा व दाखवण्याचा आमच्या टीमचे प्रयत्न केला आहे. आगामी काळात हीच आदिवासी परंपरा कशी जपली जाईल याचा विचार आमची टीम करते आहे. हे गाणे मी लिहलं आणि गायलं आहे पण हे गीत पूर्ण करण्यासाठी त्यापाठीमागे माझ्या संपूर्ण टीमचा हात आहे. संगीतकारांनीही खूप मेहनत घेतली आहे. त्याचबरोबर हे सगळे टीम वर्क आहे. “सुरगाणा सुरगाणा” गाण्याला जसा प्रतिसाद भेटला तसाच या गीतालाही भेटेल हीच अपेक्षा आहे.
– भावेश बागुल, गायक व गीतकार, चिंचला ता.सुरगाणा