Monday, March 17, 2025

अकोले : डांगाणातला आदिवासी शेतकरी रांगेत, खताच्या एका गोणी साठी दिवस गेला !

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

राजूर : अकोले तालुक्यातील राजूर भागातील चाळीस गावांची मुख्य बाजरपेठ राजूर या ठिकाणी आज भल्या सकाळ पहाटे पाच वाजेपासून आदिवासी शेतकरी यांची प्रंचड गर्दी बगायला मिळली, या गर्दीस केवळ लोकप्रतिनिधी व प्रशासकीय कृषी विभाग कारणीभूत आहेय, असे राजूर गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते अक्षय देशमुख म्हणाले.

देशमुख म्हणाले की, ‘या ठिकाणी आदिवासी ग्रामीण भाग असताना नेहमीच दुजाभाव केला जातो. खताचा तुटवडा हा वर्षभर नाही तर ऐन पावसाळ्यात हंगामाच्या वेळी होत असतो. त्यामुळे शेतकरी वैतागून आपली नाराजी व्यक्त करत आहेत. मात्र समोर यायला कोणी तयार नाही.

प्रशासनाने मुबलक प्रमाणात खताचा पुरवठा करावा व स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. तसेच तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांनी देखील या गंभीर समस्या कडे लक्ष द्यावे, अन्यथा शेतकरी वर्ग येणाऱ्या काळात मोठे जनआंदोलन उभे करेल, असेही देशमुख म्हणाले.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles