Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड शहरातील धोकादायक खड्डे बुजवा, 90 टक्के खड्डे बुजवल्याचा पालिकेचा दावा...

पिंपरी चिंचवड शहरातील धोकादायक खड्डे बुजवा, 90 टक्के खड्डे बुजवल्याचा पालिकेचा दावा खोटा – सचिन चिखले

आयुक्तांच्या दालनासमोर मनसेचे आंदोलन

पिंपरी चिंचवड : शहरातील 3 हजार 773 खड्डयापैकी यापैकी 3 हजार 382 म्हणजे 90 टक्के खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण झाल्याचा महापालिकेचा दावा खोटा आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केला आहे. शहर खड्डेमुक्त करून नागरिकांच्या रस्ते सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी मनपा आयुक्त शेखर सिंह साहेब यांचेकडे सचिन चिखले यांनी केली आहे.

शहराध्यक्ष सचिन चिखले, महापालिका सेनेचे अध्यक्ष रूपेश पटेकर यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड मनपा कार्यालयात झालेल्या या आंदोलनात राजू सावळे, अश्विनी बांगर, सीमा बेलापूरकर,विशाल मानकरी, रुपेश पटेकर, दत्ता देवतरासे, सुशांत साळवी, सीमा बेलापूरकर, अलेक्स मोझेस, सुरेश सकट, नारायण पठारे, कृष्णा महाजन, शिशिर महाबळेश्वरकर, गणेश अवघडे, आकाश पांचाळ, विशाल साळुंके, कैलास दुर्गे, वैशाली बोत्रे, विद्या कुलकर्णी, पंकज चपटे, श्रद्धा देशमुख, अनिता पांचाळ, नितीन चव्हाण आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी प्रशासनाच्या गलथान व निकृष्ट कामा विरोधात घोषणा दिल्या.

Lic
जाहिरात
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय