Thursday, May 9, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडचिखली-जाधववाडी, वडाचा मळा, चव्हाण चौक येथे कै.सुभद्राबाई दत्तु चव्हाण यांच्या स्मरणार्थ शेतकरी...

चिखली-जाधववाडी, वडाचा मळा, चव्हाण चौक येथे कै.सुभद्राबाई दत्तु चव्हाण यांच्या स्मरणार्थ शेतकरी आठवडे बाजाराचे उदघाटन

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : चिखली जाधववाडी, वडाचा मळा, चव्हाण चौक येथे शेतकरी आठवडा बाजाराचे उदघाटन प्रगतीशील शेतकरी सुदाम दत्तू चव्हाण यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी जेष्ठ नागरिक प्रदीप काटे उपस्थित होते. येथील युवा नेते रोहन चव्हाण यांच्या संकल्पनेतून आठवडा बाजार सुरू करण्यात आला.

यावेळी रोहन चव्हाण यांनी सांगितले की, येथील विविध गृहसंकुलामध्ये राहणाऱ्या नोकरदार, व्यावसायिक कुटुंबातील गृहिणींना स्वछ आणि स्वस्त भाजीपाला त्यांच्या घरापाशी मिळण्याची सुविधा करून देण्यात आली आहे. आम्ही शेतकरी कुटुंबातील आहोत, माझी आई कै.सुभद्राबाई चव्हाण यांच्या स्मृती निमित्त हा आठवडा बाजार सुरू केला आहे. येथील नागरिकांना भाजीपाला खरेदी करण्यासाठी दूरवर जावे लागत होते. इथे सर्व प्रकारची ताजी भाजी व इतर दैनंदिन गरजेच्या वस्तू सहज उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ग्राहक आणि शेतकरी या दोघांचा या बाजारामुळे फायदा होणार आहे, असे रोहन चव्हाण यांनी सांगितले.

Lic
जाहिरात
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय