Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडचिखली प्राधिकरणात भटक्या कुत्र्यांची दहशत – पालिकेची 'डॉग व्हॅन' या भागात पाठवा

चिखली प्राधिकरणात भटक्या कुत्र्यांची दहशत – पालिकेची ‘डॉग व्हॅन’ या भागात पाठवा

मनपाचे पशु वैद्यकीय विभाग काय करत आहेत

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : चिखली प्राधिकरण पेठ क्र. १६ राजे शिवाजीनगर मध्ये भाजी मंडई, डायगोनाल मॉल, सावता माळी उद्यान, पंतनगर रस्ता व अंतर्गत एकूण सर्व रस्त्यावर एकूण आठ भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या गेली वर्षभर धुमाकूळ घालत आहेत. येथील श्वानप्रेमींनी कोरोनकाळात उपासमार होणाऱ्या या कुत्र्यांना खाऊ घालण्यास सुरवात केली. त्यानंतर येथे मुबलक खायला देणारे भूतदयावादी असल्यामुळे कुदळवाडी, जाधववाडी, पावरवस्ती येथील भटकी कुत्री येथे मोठ्या प्रमाणात स्थलांतर करून आली.

चिकन, मटण, माशे यांची दुकाने आणि श्वानप्रेमी यामुळे येथील कुत्र्यांना चांगले दिवस आले. येथील लोकप्रतिनिधींनी पेठ क्र.१६ मधील सुंदर रस्ते बनवले.
या सिमेंट काँक्रीटच्या सुबक, स्वच्छ रस्त्यावर आता ही भटकी कुत्री निवास करून राहिली आहेत. येथे रस्त्यावर उभ्या असलेल्या चारचाकी, कार्गो कंटेनर खाली ही कुत्री दिवसा आराम करत असतात. यातील बऱ्याच कुत्र्यांची लाळ गळत आहे. या कुत्र्यांची हद्दीच्या वादावरून अहोरात्र आणि भर दिवसा भांडणे सुरू असतात. कामावर जाणाऱ्या नागरिकांवर पहाटे ही कुत्री अंगावर धावून जात आहेत. रात्री कामावरून येताना या कुत्र्यांमूळे नागरिक घाबरून जात आहेत.

मागील दोन महिन्यांपासून पंतनगर रस्त्यावर रात्री १२ नंतर कुत्र्यांच्या दोन तीन गटात महायुद्ध सुरू आहे. त्यामुळे भुंकण्याच्या जीवघेण्या आवाजामुळे झोपेचे खोबरे होते. लहान मुले घाबरून दाचकतात. ही भुकेली कुत्री सकाळी सेवा रस्त्यावर व विविध सोसायट्यांच्या आवारात प्रातर्विधी उरकून पेठ क्र १६ मध्ये खाण्याच्या शोधात सैराट फिरत असतात. आमच्या निवासी उपनगरात अशांतता निर्माण करून विद्यार्थी, लहान मुले, माता भगिनी, नोकरदार, व्यावसायिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या या भटक्या कुत्रांचा पिंपरी चिंचवड मनपाच्या पशुवैद्यकीय विभागाने त्वरित बंदोबस्त करावा. येथील सर्व भटकी कुत्री डॉग व्हॅन मध्ये घालून मनपाने आपल्या ताब्यात घ्यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जेष्ठ नागरिक, येथील रहिवासी क्रांतिकुमार कडुलकर यांनी केली आहे.

Lic
जाहिरात
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय