बाडमेर : राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील एका (दि.2) गावात हवाई मिग – 29 कोसळले असून पायल सुखरूप आहे. विमान खाली पडल्यानंतर त्या ठिकाणी मोठी आग लागली आणि विमानाचे प्रचंड नुकसान झाले, हे नेहमी विमान प्रशिक्षणासाठी वापरले जात होते. क्रॅश होण्यापूर्वी पायलटने पॅरॅशूट मधून स्वतःची सुटका करून घेतली त्यामुळे त्याचा जीव वाचला आहे. (Plane crash)
हा मुळात अपघात कसा झाला यासाठी भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले असून लवकरच त्याची चौकशी पूर्ण होईल.
जून महिन्यात नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एका शेतात सुखोई लढाऊ विमान कोसळले होते. यावेळीही वैमानिक आणि सहवैमानिक वेळेत बाहेर पडल्याने ते बचावले.
विमान निर्जन भागात कोसळल्यामुळे विमानाला आग लागली, सुदैवाने कोणतीही जीवितहानी याबद्दल झाली नाही. (Plane crash)
स्थानिक शेतकरी, पोलीस,अग्निशामक दलाच्या पथकांनी अपघातस्थळी धाव घेऊन मदत कऱ्य सुरू केले. प्रशिक्षणासाठी वापरला जाणाऱ्या विमानांचे या वर्षात चार वेळा अपघात झालेले आहेत.