Saturday, October 5, 2024
Homeजिल्हाPune : सुरेंद्र पठारे फाऊंडेशनच्या कार्यशाळेत लहान मुलांनी साकारले ईको फ्रेंडली गणपती...

Pune : सुरेंद्र पठारे फाऊंडेशनच्या कार्यशाळेत लहान मुलांनी साकारले ईको फ्रेंडली गणपती बाप्पा

Pune : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाच्या संरक्षणासाठी व लहान मुलांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची जाणीव निर्माण करण्यासाठी सुरेंद्र पठारे फाऊंडेशनच्या वतीने खराडी येथील ब्ल्यु बेरी हॉलमध्ये (ता. १) पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी २४ ऑगस्ट रोजी वडगावशेरी येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या हॉलमध्ये देखील या कार्यशाळा पार पडली होती. दोन्ही ठिकाणच्या कार्यशाळेला लहान मुलांसोबतच पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ५१३ मुलांनी या दोन्ही कार्यशाळेत सहभाग नोंदवला.

या कार्यशाळेत लहान मुलांनी शाडू मातीपासून आपापल्या हातांनी गणेश मूर्ती साकारल्या. प्रत्येक मूर्ती निराळी, स्तुत्य व कल्पकतेने भरलेली होती. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद व त्यांची श्रद्धा मूर्तीच्या रूपात प्रकर्षाने दिसून आली. मुलांमध्ये पर्यावरणाबद्दल निर्माण होणारी ओढ व एक नवीन कला अवगत होत असल्याचे पाहून पालकांनीही समाधान व्यक्त केले.

सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र बापूसाहेब पठारे यांनी या कार्यशाळेबद्दल बोलताना सांगितले, “गणेशोत्सव हा उत्सव केवळ आनंदाचाच नाही, तर पर्यावरणाबद्दलची आपली जबाबदारी ओळखण्याचाही उत्सव आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना त्यांच्या मनात रुजावी आणि त्यांनी लहान वयातच निसर्गाबद्दलची जबाबदारी ओळखावी, याच उद्देशाने मागील दोन वर्षांपासून या कार्यशाळेचे आयोजन करत आलो आहोत. मूर्ती तयार करताना लहानग्यामच्या कलात्मक गुणांनाही वाव मिळतो व मातीशी तुटत चाललेली त्यांची नाळ पुन्हा जुळते.” (pune)

पालकांनी देखील या उपक्रमाचे कौतुक म्हणाले, की “मुलांमध्ये पर्यावरणविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी असे उपक्रम अतिशय आवश्यक आहेत. मुलं आजकाल फोनमध्येच अधिक वेळ घालवतात आणि पालक म्हणून आम्हालाही बऱ्याचदा चिंता लागून राहते. पण या उपक्रमामुळे मुलांना मातीने मूर्ती तयार करण्याची संधी मिळाली तसेच फोन चालवणारे हात मातीत रमलेले पाहून आनंद होत आहे.”

दोन्ही रविवारी पार पडलेल्या कार्यशाळेचा उद्देश मुलांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना समजावून देणे व त्यांच्या कलात्मकतेला प्रोत्साहन देणे, हा होता, असे मत सुरेंद्र पठारे फाऊंडेशनने व्यक्त केले.

(pune)

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार

मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती

मोठी बातमी : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, शिवरायांच्या पुतळ्या राजकारण तापले

“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” नारायण राणे यांची जीवे मारण्याची धमकी

Telegram : टेलिग्रामवर भारतात बंदी येणार ? वाचा काय आहे प्रकरण !

शासकीय, निमशासकीय विभागात हजारो विविध पदांसाठी भरती, वाचा एका क्लिकवर !

खूशखबर ; भारतीय रेल्वेमध्ये 14,298 टेक्निशियन पदांसाठी मोठी भरती होणार

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 पदांची मेगा भरती, आजच अर्ज करा

संबंधित लेख

लोकप्रिय