Sunday, April 28, 2024
Homeजिल्हापिंपरी चिंचवड : महाराष्ट्र नवनिर्माण सेना व प्राधिकरण विचार मंच निगडी आयोजित...

पिंपरी चिंचवड : महाराष्ट्र नवनिर्माण सेना व प्राधिकरण विचार मंच निगडी आयोजित भव्य रक्तदान शिबिर

पिंपरी चिंचवड : महाराष्ट्र नवनिर्माण सेना व प्राधिकरण विचार मंच निगडी आयोजित भव्य रक्तदान शिबिर रविवार दिनांक 2 मे रोजी झाले.

रक्तदान शिबिर मध्ये शासनाने दिलेल्या सर्व नियम पाळून व सोशल डिस्टंस पाळुन सेनेटायझर वापरुन रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. रक्तदान शिबिरात प्राधिकरण मधील व शहरातील अनेक भागातील महिला व नागरिकांनी सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान केले व अनेक प्लाझ्मा दात्यांची नावं नोंदणी केली. रक्तदान करणाऱ्या प्रत्येकाचे प्रमाणपत्र देऊन आभार व्यक्त करण्यात आले.

यावेळी मनसे शहर अध्यक्ष व नगरसेवक सचिन चिखले माजी नगरसेविक अश्विनी चिखले, माजी नगरसेवक बाळासाहेब हिंदळेकर, माजी नगरसेवक डाॅ. नितीन गांधी, हेमंत डांगे, शहर सचिव रुपेश पटेकर, पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष  राजू सावळे, विशाल मानकरी, विभाग अध्यक्ष दत्ता देवतरासे, सचिव अनिकेत प्रभु, वाहतूक सेना अध्यक्ष सुशांत साळवी, C/A दिशा ग्रुप रोहित बंगाळे, शंतनु तेलंग, गणेश काळभोर, मंगेश काळभोर, सुमित काळभोर, निलेश शिवणेकर, सुनीता बंगाळे, आप्पा मोरे, श्रीकांत धावारे, तानाजी जाधव, चिकु मालडदार यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

गांधी नर्सिंग होम चे डाॅक्टर व सर्व कर्मचारी तसेच संजीवनी ब्लड बँक भोसरी चे सर्व सहकारी मित्र यांचे विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड उपशहराध्यक्ष बाळा दानवले, महिला प्राधिकरण विचार मंच निगडी च्या स्वाती दानवले यांनी केले. रक्तदान शिबिराचे मुख्य नियोजन उपविभाग अध्यक्ष ओंकार पाटोळे, प्रभाग अध्यक्ष दिपेन नाईक, वार्ड अध्यक्ष प्रसाद मराठे, शाखा अध्यक्ष शंतनु चौधरी, गट अध्यक्ष ऋषिकेश कांबळे, रोहित शिंदे, गणेश उजैणकर, विठ्ठल कर्डिले, दीपक अहिराव यांनी केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय