Wednesday, May 15, 2024
Homeजिल्हामालेगाव : शरद जाधव यांची बिरसा क्रांती दलाच्या तालुका अध्यक्षपदी निवड

मालेगाव : शरद जाधव यांची बिरसा क्रांती दलाच्या तालुका अध्यक्षपदी निवड

मालेगाव (नाशिक) : शरद दादाजी जाधव यांची  बिरसा क्रांती दलाच्या तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. बिरसा क्रांती दलाचे नाशिक विभाग प्रमुख आणि अध्यक्ष मनोज पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 2 एप्रिल 2021 रोजी झूम मिटींग आयोजित करण्यात आली होती. 

त्यावेळी मालेगाव तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शरद जाधव हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांचे शिक्षण बी.ए.बी .एड. इतके झालेले आहे. राजलगांव ग्रामपंचायतचे ते विद्यमान सदस्य आहेत. हिरो मोटो कार्पोरेशन लिमिटेड मध्ये ते सुपरवायझर म्हणून कामाला आहेत. आदिवासी समाजाबद्धलची त्यांची काम करण्याची धडपड बघून तालुका अध्यक्ष पदी त्यांची निवड करण्यात आली, असल्याची माहिती सुशीलकुमार पावरा यांनी दिली.

तर उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर अशोक मोरे, सुभाष पुंजाराम सोनवणे, सचिव कृष्णा वाघ, कार्याध्यक्ष भगवान दोधाजी माळी, कोषाध्यक्ष विजय अहिरे, सहसचिव अजय दादाजी बागुल, सल्लागार केशव मैघाने, संघटक मनोहर सोनवणे, प्रसिद्धी प्रमुख सोनू सोनवणे, महिला प्रतिनिधी मनिषा अशोक माळी, सदस्य गोरख नाडेकर, सुभाष सोनवणे, प्रकाश पवार याप्रमाणे तालुका शाखा कार्यकारिणी निवड करून जाहीर करण्यात आली आहे. 

यावेळी बिरसा क्रांती दलाचे कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष, चिंधू आढळ, पेठ तालुका अध्यक्ष मधुकर पाडवी, बागलाण कार्याध्यक्ष दादाजी बागूल, नंदुरबार तालुका अध्यक्ष सुरेश पावरा हे उपस्थित होते. 

मनोज पावरा यांनी नवनिर्वाचित तालुका पदाधिकारी व सदस्य यांचे हार्दिक अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आदिवासी समाजावरील अत्याचार व अन्याय दूर करण्यासाठी तसेच आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण काम करणार असल्याचेे शरद जाधव यांनी यावेळी सांगितले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय