Friday, April 26, 2024
Homeजिल्हापिंपरी चिंचवड : फळ, भाजीविक्रेते, सेवा देणारी माणसं त्यांच्यावर अन्याय करू नका...

पिंपरी चिंचवड : फळ, भाजीविक्रेते, सेवा देणारी माणसं त्यांच्यावर अन्याय करू नका : बाबा कांबळे

सांगवी येथील हातगाडी धारक, फळ, भाजी विक्रेते यांचे ‘ह ‘ प्रभाग कार्यालयासमोर आंदोलन

सांगवी : येथील फळ, भाजीविक्रेते , हातगाडी, पथारी धारक यांच्यावरती अतिक्रमण कारवाईकरुन रस्ते चकचकीत आणि मोकळे करणार अशी भूमिका घेऊन सांगवी येथील फळे भाजी विक्रेत्यांचे ४×४ चा गाळ्यांमध्ये पुनर्वसन केलं जाणार आहे. मुळात 1999 साली जुनी सांगवी येथे हे गाळे बांधण्यात आले असून हि मंडई अनेक बाबीने अपूर्ण आहे या भाजी मंडईमध्ये कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाहीत, व्यवस्था नाही. पार्किंगची  पिण्याच्या पाण्याची लाईटची व्यवस्था नाही. आणि कोरोनाच्या  आजच्या काळामध्ये जनावरांना कोडतात असे कोरोडया  सारखं फळभाजी विक्रेत्यांचे पुनर्वसन होणार असेल तर हे इथल्या हातगाडी, पथारी धारकांना मान्य नाही. आम्ही मानस आहोत जनावर नाहीत , आधुनिक पद्धतीने सर्व सुखसोयी उपलब्ध असलेली भाजी मंडई तयार करून त्या ठिकाणीगाळे बांधण्यात यावेत आणि मगच आमचे पुनर्वसन करावे तोपर्यंत अतिक्रमण कारवाई करू नये या मागणीसाठी सांगवी  येथील हातगाडी धारक, पथारी धारक, भाजीविक्रेते यांनी “ह’  प्रभाग कार्यालय येथे आंदोलन करून प्रभाग अधिकारी अभिजित हराळे यांना निवेदन दिले. टपरी , पथारी, हतगाडी पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी टपरी, पथारी, हतगाडी पंचायत सचिव प्रल्हाद कांबळे, राजू काटे, राजू प्रभु, अण्णा कराळे, गणेश वाघमारे, वामन खानापुरे, आदित्य सूर्यवंशी, प्रशांत सोनकिरे, आदी उपस्थित होते.

यावेळी बाबा कांबळे म्हणाले टपरी, पथारी हातगाडी धारक, फळभाजी विक्रेते हे सेवा देणारे घटक आहेत. या घटकांमुळे शहरातील नागरिकांना ताजे व कमी किमतीमध्ये भाजीपाला मिळतो, फळ फ्रुट मिळतं परंतु काही व्यक्ती या घटकांना उपद्रवमूल्य रस्त्यामध्ये आडकाठी करणारे घटक असे म्हणतात हे चुकीचे असून हे रस्त्यामध्ये उपद्रव करणारे नाही तर सेवा देणारे घटक आहेत. त्यांच्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने कायदा केला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत देखील स्वतंत्र उपविधी मंजूर केली आहे. यांच्यावर असे अमानुषपणे कारवाई करता येत नाही. अमानुषपणे यांच्यावर कारवाई करायची त्यांना मारायचं, झोडायचे हे जे काम सध्या राज्यकर्ते आणि प्रशासन करत आहे है अत्यंत चुकीचे आहे. आम्ही या घटकांसाठी काम करत राहणार त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांचे आंदोलन सुरू राहील असे बाबा कांबळे यावेळी म्हणाले.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय